कोरियन तरुणीशी लगट करणाऱ्या दोन तरुणांच्या मुसक्या आवळल्या

सोशल मीडियावर झाला होता व्हीडिओ व्हायरल

कोरियन तरुणीशी लगट करणाऱ्या दोन तरुणांच्या मुसक्या आवळल्या

एका कोरियन मुलीशी छेडछाड केल्याप्रकरणी दोन युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. यूट्य़ुबर असलेली ही २४ वर्षीय युवती खार परिसरात व्हीडिओ चित्रीकरण करत होती. आपल्या प्रेक्षकांशी तिचा संवाद सुरू होता, तेवढ्यात दोन युवकांनी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मोबीन चांद व मोहम्मद नकीब अशी या युवकांची नावे असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी खार पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला असून ३५४च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी यासंदर्भात ट्विट केले आहे की, खार पोलिस ठाण्याने यासंदर्भातील व्हीडिओ पाहिल्यानंतर स्वतःहून ही कारवाई केली आणि त्या दोन युवकांना अटक केली आहे. त्यांच्यावर कलमे लागू करण्यात आली आहेत.

या मुलीच्या छेडछाडीचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. ती युवती खारच्या रस्त्यावर व्हीडिओ करत होती, तेव्हा हे तरुण तिच्याजवळ आले आणि त्यांनी तिला आपल्या कारमध्ये बसण्यासाठी गळ घालायला सुरुवात केली. तिने नकार दिला. त्यांनी तिच्या खांद्यावर हात टाकून तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा:

कुर्ल्यामध्ये श्री रामाच्या यात्रेला सुरुवात

राज्याबाहेर प्रकल्प का गेले याचे कारण येणार समोर

ISIS चा म्होरक्या युद्धात ठार, नव्या म्होरक्याचं नाव घोषित

अफगाणिस्तानात स्फोटांची मालिका सुरूच; मदरशातील स्फोटाने घेतले १८ बळी

 

या युवतीनेही आपल्या ट्विटरवरून ही घटना सांगितली. एक तरुण आपल्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. मी लाइव्ह स्ट्रिमिंग करत असताना त्यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी आपल्याशी झटापट करण्याचा प्रयत्न केला. यापुढे मला असे स्ट्रिमिंग करताना काळजी घ्यावी लागेल.

यासंदर्भात ट्विटरवरून अनेकांनी व्हीडिओ शेअर करत या युवकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या युवकांना जेरबंद केले.

Exit mobile version