मुंबई- नाशिक महामार्गावर गाडीत सापडले दोन कोटी रुपये

पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन तपास केला सुरू

मुंबई- नाशिक महामार्गावर गाडीत सापडले दोन कोटी रुपये

राज्यात साध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून आचारसंहिता लागू आहे. या आचारसंहिता काळात रोख रक्कम बाळगण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच पैशांचा गैरवापर निवडणूक काळात होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाचे पथक, पोलीस आणि आयकर विभागाची नजर बेकायदेशीर रक्कम बाळगण्यावर असते. जागोजागी नाकाबंदी करण्यात आली असून अनेक ठिकाणी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. यामाध्यमातून वाहनांची तपसणी केली जाते. आतापर्यंत राज्यात काही ठिकाणी या यंत्रणांनी कारवाई करत रोकड जप्त करण्याचे काम केले आहे.

दरम्यान, मुंबई- नाशिक महामार्गावर कसारा घाटातील चिंतामण वाडी पोलीस चौकीजवळ स्थानिक पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागल्याची माहिती आहे. पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान नाशिकहून मुंबईकडे जाणारी एक गाडी रोखून त्याची तपसणी केली असता त्यात काही रोकड आढळून आली आहे. एमएच ११ बीव्ही ९७०८ असा गाडीचा क्रमांक असून या गाडीत दोन कोटी रुपयांची रक्कम आढळून आली आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या चिंतामण पोलीस चौकीजवळ स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी एमएच ११ बीव्ही ९७०८ या गाडीत रोख रक्कम आढळून आली. या गाडीमधून अंदाजे दोन कोटी रुपयांच्या आसपास रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन भरारी पथकांकडून पैसे मोजण्याचे काम सुरू आहे.

हे ही वाचा : 

मलिकांना उमेदवारी नको म्हटलं, ऐकलं नाही, आता शिंदे गटाच्या उमेदवाराचे काम करू!

घुसखोर रोहिंग्यांना हवा आहे शाळेत प्रवेश, पण…

उत्तराखंडमध्ये रेल्वे उलटवण्याचा कट; हरिद्वारहून डेहराडूनला जाणाऱ्या ट्रॅकवर सापडला डिटोनेटर

कॅनडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भारताविरुद्ध गुप्तचर माहिती फोडल्याची कबुली

उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव आणि निवडणूक भरारी पथकाकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात तपासणीदरम्यान पाच कोटी रुपयांची रक्कम सापडली होती. त्यानंतर आता शहापूर तालुक्यात दोन कोटी रुपयांची रक्कम आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Exit mobile version