शिवडीच्या एका चाळीतून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ४४ वर्षीय ड्रग्स सप्लायरला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या साथीदारांचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी दिली आहे.
ही कारवाई मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ९ च्या पथकाने सोमवारी केली असून अटक करण्यात आलेल्या आरोपीला २५ ऑगस्ट पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे ही वाचा:
विक्रोळीतील पालिका शाळेतील चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार
चांद्रयानाच्या लँडिंगचा ऐतिहासिक क्षण घरबसल्या अनुभवता येणार
महिला पोलिस आणि मुलगी घरी मृतावस्थेत; पतीचा मृतदेह झाडावर
अभिनेते सनी देओल म्हणतात, आता निवडणूक लढणार नाही!
सलीम हारून रशीद खान असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्स सप्लायरचे नाव आहे. सलीम हा शिवडीतील आदमजी जिवाजी चाल येथे कुटुंबियांसह राहण्यास आहे. सलीम हा दुबई रिटर्न असून अठरा वर्षे तो दुबईत वाहन चलाकची नोकरी करीत होता. मुंबईत आल्यानंतर तो एका बांधकाम व्यवसायिकाकडे वाहन चालक म्हणून कामाला लागला होता. मात्र एका अपघातानंतर त्याच्या पायाला गंभीर इजा होऊन त्याला अपंगत्त्व आल्यामुळे त्याच्याकडे कुठलेही काम नसल्यामुळे त्याने दक्षिण मुंबईत किरकोळ ड्रग्सची विक्री करू लागला होता. त्यानंतर सलीम हा स्वतः सप्लायर बनून तो दक्षिण मुंबईतील किरकोळ ड्रग्स विक्रेत्याला ड्रग्स सप्लाय करू लागला होता.
ड्रग्स माफिया इम्रान सोहेल खान याच्याकडून मोठ्या प्रमाणात एमडी हा अमली पदार्थ घेऊन तो त्याची दक्षिण मुंबईत विक्री करीत होता. सलीम खान याच्या ड्रग्स विक्रीची माहिती मुंबई गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली. पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ९ चे प्रभारी दया नायक यांचं पथकाने शिवडी येथील चाळीत छापेमारी करून सलीमला १ किलो २८ ग्राम मफेड्रोन (एमडी) सह अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेकडने सलिम यांच्याकडून जप्त केलेल्या अमली पदार्थही किंमत २ कोटी ४ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.