24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामाउद्यानातल्या खड्ड्यात पडून दोन मुलाचा मृत्यु

उद्यानातल्या खड्ड्यात पडून दोन मुलाचा मृत्यु

Google News Follow

Related

अँटॉप हिलमधील दुर्देवी घटना

अँटॉप हिल येथील सीजीएस कॉलनी या ठिकाणी असलेल्या खड्ड्यात पडून दोन मुलांचा बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अँटॉप हिल पोलिसानी घटनेची नोंद केली असून तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.

यशकुमार चंद्रवंशी (११) आणि शिवम जयस्वाल (९) असे या दोन्ही दुर्देवी मुलाचे नावे आहेत. अँटॉप हिल सेक्टर ७ मधील सीजीएस कॉलनी या परिसरात राहणारे दोन्ही मुले सोमवारी सायंकाळी इमारत क्रमांक ४३ जवळील बागेजवळ खेळत असताना तेथील एका खड्ड्यात पडले, या खड्ड्यात पाणी असल्यामुळे दोघाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या अँटॉप हिल पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी सायन रुग्णालय या ठिकाणी पाठवली असून कंत्राटदार याला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

उद्यानाच्या सुशोभीकरण कामासाठी कंत्राटदाराने खोदलेल्या खड्डयातील पाण्यात ही मुले पडली. याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

 

हे ही वाचा:

‘समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नवाब मलिक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करा’

आर्यन खानप्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर भाई जगताप यांनी उपस्थित केली शंका?

आयपीएलमध्ये असणार ‘हे’ २ नवे संघ

अमित शहा यांनी काश्मीरमधील स्थानिकाचा नंबर का केला सेव्ह?

 

सीजीएस कॉलनीमधील सेक्टर ७ मधील उद्यानाच्या सुशोभिकरणाचे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. कंत्राटदाराने उद्यानात मोठा खड्डा खणला होता पण तो उघडा होता आणि त्यात पाणी भरले होते. काम अर्धवट असतानाही उद्यान सुरू असल्याने परिसरातील मुले खेळण्यासाठी या उद्यानात जातात. सोमवारी उद्यानात मुले खेळत असताना यशकुमार आणि शिवम या खड्ड्याजवळ गेले आणि त्यात ते पडले. पोहता येत नसल्याने त्यांच्या नाका तोंडात पाणी गेले. इतर मुलांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी आजूबाजूला असलेल्या लोकांना गोळा केले. नंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात आले. दोन्ही मुलांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा