मरीन ड्राईव्हला फिरायला निघालेल्या मित्रांच्या मोटारीला अपघात, दोन भाऊ ठार

तिघे झाले जखमी

मरीन ड्राईव्हला फिरायला निघालेल्या मित्रांच्या मोटारीला अपघात, दोन भाऊ ठार

घाटकोपर येथे पार्टी करून पहाटे मरीन ड्राईव्हला फिरण्यासाठी निघालेल्या पाच मित्राच्या मोटारीला सायन जवळ अपघात होऊन मोटारीने पेट घेतला.या आगीत दोन दोन सख्या भावांचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाता प्रकरणी सायन पोलिसांनी मोटार चालक कुणाल अतार विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 

प्रेम वाघेला (१८) आणि अजय वाघेला (२०) अशी अपघातात मृत झालेल्या भावांची नावे आहेत. हरीश कदम (१९) हा गंभीररीत्या भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. कुणाल अतार (३३) आणि रितेश भुत ( २५) हे किरकोळ जखमी झाले आहे. प्रेम, अजय हरीश आणि रितेश हे चौघे मित्र असून मानखुर्द येथील अणुशक्ती नगर,मंडाळा येथे राहणारे आहेत तर कुणाल हा नवीमुंबईतील नेरुळ येथे राहणारा आहे.

 

हे ही वाचा:

विराटने सचिनचा विक्रम मोडला

भारताची पाकिस्तानवर विक्रमी मात

आमदार अपात्रतेप्रकरणाची सुनावणी १४ सप्टेंबरला

खलिस्तानी कारवायांकडे पंतप्रधान मोदींनी कॅनडाच्या राष्ट्रप्रमुखांचे लक्ष वेधले

कुणाल याची सासुरवाडी मंडाळा येथील आहे, कुणाल हा रविवारी स्वतःची ‘हुंदाई आय २०’ ही मोटार घेऊन मंडाळा येथे सासुरवाडीला आला होता, रात्री उशिरा कुणाल आणि इतर चौघे पार्टी करण्यासाठी घाटकोपर येथे गेले, त्याठिकाणी चौघानी पार्टी केली होती, त्यानंतर सोमवारी पहाटे पाचही जण घाटकोपर येथून मरीन ड्राईव्ह येथे फिरण्यासाठी निघाले होते. मरीन ड्राईव्हच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या मोटारीवरील कुणालचे नियंत्रण सुटले आणि मोटार डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड सायन येथे दुभाजकावर धडकली, काहि क्षणातच मोटारीने पेट घेतला, या आगीत प्रेम,अजय आणि हरीश कदम हे तिघे गंभीररीत्या होरपळले आणि कुणाल आणि रितेश हे दोघे जखमी झाले.

 

 

अपघातस्थळी दाखल झालेल्या सायन पोलीस आणि अग्निशमन दलाने पाचही जणांना मोटारीतून बाहेर काढून उपचारासाठी सायन रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी प्रेम आणि अजय या दोघांना तपासून मृत घोषित केले तर इतर तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे, तिघांपैकी हरीश कदम याची प्रकृती चिंताजनक आहे. सायन पोलिसानी या प्रकरणी कुणाल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

Exit mobile version