ईडीचे अधिकारी असल्याचे भासवून सरकारी अधिकाऱ्यांकडून खंडणी उकळणाऱ्या दोघा भावांना ओडिशातील धेनकेनाल जिल्ह्यातून अटक करण्यात आली. या प्रकरणी छत्रपूरचे उपजिल्हाधिकारी देबदत्ता मोहंता यांनी तक्रार केली होती.
या दोन आरोपी भावांची नावे तरिनिसेन मोहापात्रा (३०) आणि ब्रह्मशंकर मोहापात्रा (२७) अशी आहेत. स्पेशल टास्क फोर्सने शनिवारी धेनकनल परिसरातील त्यांच्या घरातून त्यांना अटक केली. हे दोघे भाऊ ईडीचे अधिकारी असल्याचे भासवून सरकारी अधिकाऱ्यांकडून खंडणी उकळत होते. त्यासाठी ते जीपे किंवा पे फोनपेच्या माध्यमातून पैसे घेत असत.
यानंतर ते अधिकाऱ्यांना त्यांच्यावर दाखल असलेल्या प्रकरणातून त्यांना क्लीन चीट देत असल्याचे बनावट ‘क्लीअरन्स सर्टिफिकेट’ही देत असत. या दोघांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. त्याची परतफेड ते करू शकत नसल्याने त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनाच फसवण्याची शक्कल काढली होती.
हे ही वाचा:
एल्विश यादवने पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरविल्याची दिली कबुली!
अजमेरमध्ये साबरमती एक्स्प्रेसला अपघात; मालगाडीला धडकून चार डबे रुळावरून घसरले
सर्वाधिक निवडणूक रोखे देणाऱ्या कंपनीकडून ५०९ कोटी द्रमुक पक्षाला
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा १६ वर्षांचा दुष्काळ संपला!
यातील एका आरोपीने भुवनेश्वर येथील ईडीचे अतिरिक्त संचालक अल्याचे सांगून राज्यभरातील विविध सरकारी विभागांतील ३०० अधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साधला होता. त्यातील काही अधिकाऱ्यांकडून खंडणी उकळण्यात त्यांना यशही आहे. यातील १६लाखांचा माग काढण्यात यश आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या दोघांकडून एक लॅपटॉप, एक कम्प्युटर, पाच मोबाइल फोन, बँकेची पासबुके आणि चेकबुके, खोटी ओळखपत्रे, १७ एटीएम कार्डे जप्त करण्यात आली आहेत.