दक्षिण मुंबईमधून दोन बांगलादेशी महिलांना अटक

दक्षिण मुंबईमधून दोन बांगलादेशी महिलांना अटक

दक्षिण मुंबईमध्ये अवैधरित्या राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. दक्षिण मुंबईमधील गिरगाव, ग्रॅन्ट रोड आणि गावदेवी परिसरात वास्तव्याला असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या दोन्ही महिला असून त्या गेल्या काही वर्षांपासून भारतात वास्तव्याला होत्या. या महिला कामाच्या शोधात बांगलादेशातून भारतात पळून आल्या होत्या. नियमानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या चारही महिलांना बांगलादेशात पाठविण्यात येणार आहे.

मुंबईसह आसपासच्या परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध परिमंडळ २ तर्फे विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत डी. बी. मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन बांगलादेशी महिलांना अटक केली. माजिदा गुलाम जिक्रिया शेख आणि नूरजहाँबेगम सुल्तान मुल्ला अशी या दोघींची नावे आहेत. यातील नूरजहाँ गेल्या सात वर्षांपूर्वी भारतात बेकायदेशिररित्या दाखल झाली होती. एका दलालाला पैसे देऊन ती बांगलादेशमधून बोटीतून कोलकाताला आली होती. त्यानतंर तेथून ती रेल्वेने मुंबईत दाखल झाली होते. गेल्या सात वर्षांपासून ती मुंबईत वास्तव्यास होती.

माजिदा ही गेल्या पंधरा वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास असून तिला एका बांगलादेशी मित्राने भारतात पाठविले होते. त्यासाठी तिने मित्राला काही रक्कम कमिशन म्हणून दिली होती. गेल्या काही वर्षांपासून ती गिरगाव परिसरात राहत होती. परिसरात छोटी-मोठी कामे करून ती उदरनिर्वाह चालवत होती. या विशेष मोहिमेअंतर्गत गावदेवी आणि व्ही. पी. रोड पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्या दोघीही बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून भारतात पळून आल्या होत्या. काही महिने कोलकाता येथे राहिल्यानंतर त्या दोघीही नोकरीसाठी मुंबईत आल्या. तेव्हापासून त्या मुंबईत अनधिकृतपणे राहत होत्या. आरोपी महिलांनी भारतात वास्तव्य करण्यासाठी काही कागदत्रे तयार केल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

हे ही वाचा:

‘डार्कनेटमधून फुटली होती यूजीसी-नेटची प्रश्नपत्रिका’

राजभवनात सध्याच्या कोलकाता पोलिसांच्या ताफ्यात मी सुरक्षित नाही!

अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी!

जगभरातील सर्वांत उंच पुलावरून धावली रेल्वे!

आरोपी महिलांविरोधात परकीय नागरिक कायदा, पारपत्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. बांगलादेशी नागरिकांना भारतात घुसखोरी करण्यात मदत करणाऱ्या दलालांची माहिती घेण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. काही दिवसांपूर्वीचं मानवी तस्करी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक करण्यात आली होती.

Exit mobile version