26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामा७ किलो युरेनियमसह दोघांना अटक, एटीएसची कारवाई

७ किलो युरेनियमसह दोघांना अटक, एटीएसची कारवाई

Google News Follow

Related

मुंबईतील मानखुर्द परीसरातून मोठ्या प्रमाणात युरेनियमचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून ही कारवाई मुंबई एटीएसच्या पथकाने केली आहे. या दोघांजवळून सुमारे ७ किलो युरेनियम जप्त करण्यात आले. त्याचे काही नमुने तपासणीसाठी ‘भाभा अणु संशोधन केंद्र’ या ठिकाणी पाठवण्यात आले असल्याची माहिती एटीएसने दिली आहे. युरेनियम कुठून व कशासाठी मागवण्यात आले याचा तपास सुरू असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

मोदी सरकारचा मोठा निर्णय, ८० कोटी नागरिकांना मिळणार मोफत धान्य

आता व्हॉट्सऍपवर शोध जवळचे लसीकरण केंद्र

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जकात विभागाच्या ताब्यात अडकलेले नाहीत

सत्ताधारी पक्ष ते प्रमुख विरोधी पक्षही नाही, काँग्रेसची अधोगती सुरूच…

जिगर पांड्या(२७) आणि अबू ताहीर(३१) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अबू ताहीर यांच्या वडिलांचा भंगाराचा व्यापार असून पांड्या हा नोकरीला आहे. ठाणे येथे राहणारा जिगर पांड्या हा युरेनियमचे काही तुकडे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथक नागपाडा युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष भालेकर यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसच्या पथकाने सापळा रचून जिगर पांड्या याला युरेनियमच्या काही तुकड्यांसह अटक करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत पांड्या याला मानखुर्द येथे राहणारा अबू ताहीर याने युरेनियमचे तुकडे विक्रीसाठी दिले होते अशी माहिती पांड्या याने एटीएसला दिली.

या महितीच्या आधारे एटीएसने मानखुर्द येथुन अबू ताहीर याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळून ७ किलो युरेनियम जप्त केले. अबू ताहीर याच्या वडिलांचा भंगारचा व्यवसाय असून हे युरेनियम भंगार मध्ये आले होते अशी माहिती ताहीर याने पोलिसांना दिली आहे. मात्र ताहीर हा खोटं सांगत असल्याचा संशय एटीएसला आहे. एटीएसने जप्त करण्यात आलेले युरेनियम तपासणीसाठी ट्रॉम्बे येथे असलेल्या ‘भाभा अणु संशोधन केंद्र’ येथे पाठवण्यात आले होते. हे युरेनियम नैसर्गिक असून मानवी जीवितास धोकादायक असल्याचे भाभा अणु संशोधन केंद्राकडून सांगण्यात आले आहे. एटीएसने जिगर पांड्या आणि अबू ताहीर या दोघांना अटक केली असून दोघांविरुद्ध ‘आण्विक ऊर्जा कायदा’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना एनआयए विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष भालेकर यांनी दिली. १२ मे पर्यंत पोलीस कोठडी दोघांना सुनावण्यात आली आहे

युरेनियम हे किरोत्सर्गी मुलद्रव्य असून ते कोणत्याही सजीवासाठी हानिकारक असते. काही अणुप्रकल्पांत युरेनियमचा वापर इंधन म्हणून केला जातो.

spot_img
पूर्वीचा लेख
आणि मागील लेख

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा