ड्रीम मॉलची अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित असल्याचे खोटे प्रमाणापत्र अग्निशमन दलाला सादर करून ना- हरकत पत्र मिळवल्याप्रकरणी भांडुप पोलिसांनी पोना कॉर्पोरेशनचे मालक हरेश दह्यालाल जोशी आणि प्रिव्हेलेज हेल्थकेअर कंपनीचे सीईओ कर्ज पुथ्थु सेरी या दोघांना अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने १० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा:
मोदी निंदा करणाऱ्या सोरेनना जगन मोहननी झापले
१०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत कळकळ पाहून कंठ दाटून आला
“अनिल परब आणतात माझ्या कामात बाधा”
भांडुप च्या एचआयडीआय चे ड्रिमी मॉल या ठिकाणी २५ मार्च रोजी आग लागली होती, या आगीत सनराईज हॉस्पिटल मध्ये असलेल्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी ड्रीम मॉल आणि सनराईज हॉस्पिटल व्यवस्थापन यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास सुरु असताना ड्रीम मॉलची अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसताना देखील शासन मान्यता प्राप्त अग्निसुरक्षा यंत्रणा तापसणारे पोना कॉर्पोरेशनचे मालक हरेश दह्यालाल जोशी आणि प्रिव्हेलेज हेल्थकेअर कंपनीचे सीईओ कर्ज पुथ्थु सेरी यांनी सनराईज हॉस्पिटलच्या फायद्यासाठी ड्रीम मॉल ची अग्निसुरक्षा व्यवस्था कार्यान्वित असल्याचे असून कार्यक्षम असल्याचे बोगस प्रमाणपत्र तयार केले होते.
व अग्निशमन दलाकडून ना- हरकत पत्र मिळवण्यासाठी हे बोगस प्रमाणपत्र अग्निशमन दलाला सादर केले होते. व अग्निशमन दलाने या प्रमाणपत्राच्या आधारावर ड्रीम मॉलला ना- हरकत पत्र दिले होते असे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी गुन्हयाच्या कलमात वाढ करून बोगस कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी भादवि कलम ४६५, ४७१, ४०९ कलम वाढवण्यात आले आहे. या दोघांना मुलुंड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना १० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.