प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाल याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणातील तपासातून मोठी बातमी समोर आली आहे. गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन असल्याची माहिती मिळत आहे. सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या दोन जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस पाठवण्यात आली आहे. सौरभ महांकाळ आणि संतोष जाधव अशी संशयीतांची नावे असून हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.
मुसेवालांवर गोळ्या झाडणाऱ्या आठ जणांपैकी दोघे जण पुण्याचे असल्याची माहिती समोर येतेय. मुसेवालांवर हल्ला करण्यासाठी आठ शार्प शूटर नेमण्यात आले होते. त्यापैकी दोघे पुण्याचे असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अटक करण्यात आलेल्या दोन शुटर्सची नावही समोर आली आहेत.
पंजाब पोलिसांच्या तपासामध्ये पुण्यातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांची नावं समोर आल्यानंतर पंजाब पोलिसांनी पुण्यामधून त्यांना ताब्यात घेतले आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी एकूण आठ जणांना सुपारी देण्यात आली होती. या आठपैकी तीन जण पंजाबमधील होते. तर अन्य पाच जणांना महाराष्ट्र आणि राजस्थानमधून बोलवण्यात आले होते. पंजाब पोलिसांनी पुण्यातून आज सकाळी दोघांना अटक केली आहे.
हे ही वाचा:
‘ठाकरे सरकारमधील मंत्री टक्केवारी मागतात’
१८ वर्षात नदालला १४ वे फ्रेंच ओपन विजेतेपद
नायजेरियात चर्चमध्ये झालेल्या गोळीबारात ५० जणांचा मृत्यू
रशिया- युक्रेन युद्धाच्या १०० दिवसांचा आढावा
पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवालाची २९ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवाला याच्यावर ३० गोळ्या झाडण्यात आल्या तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन एन-९४ रायफलच्या गोळ्या सापडल्याची माहिती दिली आहे.