नदीत मृतदेह टाकणाऱ्या दोघांना अटक

नदीत मृतदेह टाकणाऱ्या दोघांना अटक

उत्तर प्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्यातील राप्ती नदीमध्ये कोरोना रुग्णाचा मृतदेह पुलावरून टाकण्यात आला. हा व्हिडीओ अवघ्या देशभरात सोशल मीडीयावर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.

ट्विटरवरील या व्हिडिओ संदर्भात अधिक बोलताना, बलरामपूर पोलिसांनी माहिती दिली की प्रेम नाथ मिश्रा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रूग्णाला २५ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह होती. २८ तारखेला या व्यक्तीचा मृत्यू झाला त्यामुळे या व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या पुतण्याकडे देण्यात आला. संबंधित सर्व सोपस्कार करून इस्पितळातून हा मृतदेह पुतण्याने २९ तारखेला घेतला.

हे ही वाचा:

अजय देवगणने ६० कोटीला घेतले नवे घर

…इट्स कोल्ड ब्लडेड मर्डर

मेट्रो घडवणारे फडणवीस राहिले बाजूला, बिघडवणारे मुख्यमंत्री ठाकरे उद्घाटन करत फिरतायत

ठाकरे सरकारच्या बेफिकीरीमुळेच मराठा आरक्षण गेलं

२९ मे रोजी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये पीपीई किट घातलेली व्यक्ती राप्ती नदीत मृतदेह टाकत असल्याचे दिसले गेले. मुख्य वैद्यकीय अधिकारी बलरामपूर यांच्या माहितीनुसार मृतदेहाची ओळख प्रेम नाथ मिश्रा अशी झाली आहे. २५ मे रोजी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर २६ मे रोजी त्यांना दुसर्‍या प्रभागात हलविण्यात आले. २८ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला.

मृतदेह नदीत टाकल्याबद्दल दोन जणांना अटक करण्यात आली आहे. नद्यांमध्ये तरंगणारी मृत शरीरे गेले कित्येक दिवस आपण सोशल मीडीयाच्या माध्यमातून पाहात आहोत. गेल्या आठवड्यांमध्ये नदीमध्ये मृत शरीर टाकण्याच्या घटना दिवसागणिक अधिक वाढतानाच दिसत आहेत. या घटनांना राजकीय स्वरूप देऊन त्यावरून आरोपप्रत्यारोप करण्याची एक टूम निघाली आहे. उत्तर प्रदेशात काही ठिकाणी गंगा नदी किनारी मृतदेह पुरण्याची किंवा नदीत सोडून देण्याची प्रथाही आहे. पण त्यावरून उत्तर प्रदेशात कसा कोरोनाचा कहर आहे, मृतदेहांचे अंत्यविधीही करायला जागा नाही, अशा बातम्या पसरविल्या जात आहेत.

Exit mobile version