ड्रोन्स, गगनयान प्रोजेक्टची गुप्त माहिती देणाऱ्या दोघांना अटक

आयुध निर्माण कारखान्यात काम करणाऱ्या दोघांवर उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाकडून कारवाई

ड्रोन्स, गगनयान प्रोजेक्टची गुप्त माहिती देणाऱ्या दोघांना अटक

उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने आग्रा येथील ऑर्डिनेंस फॅक्टरीतून (आयुध कारखाना) हेरगिरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ला गुप्त लष्करी माहिती आणि वैज्ञानिक माहिती पाठवल्याचा दोघांवर आरोप आहे.

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथील आयुध निर्माण कारखान्यात काम करणाऱ्या एका व्यक्तीला हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (यूपी एटीएस) आग्रा येथून रविंद्र कुमार आणि त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

माहितीनुसार, रविंद्र कुमार हा फिरोजाबादमधील हजरतपूर येथील आयुध निर्माण कारखान्यात काम करत होता. यासंबंधी त्याच्याकडे काही संवेदनशील माहिती असणारे कागदपत्र होते. ज्यामध्ये डेली प्रॉडक्शन रिपोर्ट, स्क्रिनिंग कमिटीची गोपनीय पत्रे, प्रलंबित मागण्यांची यादी, ड्रोन आणि गगनयान प्रोजेक्टबद्दलची माहिती होती. ही माहिती त्याने आयएसआयशी संबंधित महिलेला पुरवल्याचा आरोप आहे.

एटीएसच्या तपासानुसार, रविंद्र कुमार याला आयएसआय महिला एजेंटने नेहा शर्मा नावाने बनावट अकाऊंट बनवून जाळ्यात ओढलं. तपासात उघड झाले की, दोघांमधील संभाषण लपवून ठेवण्यासाठी रविंद्र याने त्याच्या फोनमध्ये तिचा नंबर चंदन स्टोअर कीपर २ म्हणून सेव्ह केला होता. दरम्यान, पैशाचं आमिष दाखवून रविंद्रकडून या महिलेने गुप्त माहिती काढून घेतली. रविंद्रनेही आयएसआयला एजेंटला ऑर्डिनेंस फॅक्टरीतील निगडित अनेक गोपनीय कागदपत्रे पाकिस्तानला पाठवली.

हे ही वाचा : 

पाकिस्तानमधील स्थानिक नेत्याला लक्ष्य करून मशिदीत स्फोट; चार जखमी

सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी

इंझमाम उल हक म्हणतो, आयपीएलवर बहिष्कार टाका!

बांगलादेशचे राजदूत म्हणतात, युनूस सरकारमुळे देशात अराजक, हिंदूंवर अत्याचार

तपासादरम्यान एटीएसला रविंद्र याच्या फोनमध्ये गोपनीय माहिती आढळून आली आहे. ज्यामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी आणि गोरखा रायफल रेजिमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या लॉजिस्टिक ड्रोन चाचण्यांबद्दलच्या गोपनीय माहितीचा समावेश होता. रविंद्र हा पाकिस्तानातील आयएसआय हँडलर्सच्या थेट संपर्कात होता आणि भारतातील सुरक्षा प्रोजेक्ट्सबद्दलची माहिती तो त्यांना पुरवत होता. रविंद्र याला अटक केल्यानंतर एटीएसने त्याच्या आग्रा येथील सहकाऱ्यालाही अटक केली आहे. तसेच तपास यंत्रणांनी डिजीटल पुरवे जप्त केले आहेत. ज्यामध्ये व्हॉट्सअॅप चॅट आणि गोपिनय कागदपत्रांचा समावेश आहे.

खोक्या-बोक्याना अभय देणाऱ्याचं कंबरड मोडा! | Amit Kale | Beed | Devendra Fadnavis | Valmik Karad |

Exit mobile version