ऑक्सिजनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांच्या गठड्या वळल्या

ऑक्सिजनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांच्या गठड्या वळल्या

कोरोनावर उपयुक्त असलेल्या रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा काळाबाजार समोर आल्यानंतर आता प्राणवायूचा (ऑक्सिजन) काळाबाजार होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑक्सिजनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली असून त्याच्याजवळून बेकायदेशीर साठा करण्यात आलेल्या ३१ वैद्यकीय ऑक्सिजनचे सिलेंडर जप्त करण्यात आले आहे. इस्माईल कासिमअली अन्सारी आणि सचिन रामशेर सिंग अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पुढील तपासासाठी या दोघाचा ताबा साकिनाका पोलिसांकडे देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

वर्ध्यात तयार होणार म्युकरमायकोसिसवरील औषध

क्लीनअप मार्शलनी लुटले कारखानदाराला

‘गो फर्स्ट’ झालेल्या ‘गो एअर’चा आयपीओ

पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र

कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनसह ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने काहीजण काळ्या बाजारात ऑक्सिजन सिलेंडर आणि किट साठवून त्याची जास्त किंमतीत विक्री करीत असल्याची माहिती युनिट दहाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती, या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्यासह डोपेवाड, चौधरी, सांडभोर, तोडकर, कांबळे, रोकडे, धनावडे, मस्के, नार्वेकर, चव्हाण, अडसरे, पाटील यांनी साकिनाका परिसरातील काजूपाडा, बॉम्बे क्रिएशनच्या गोदामात छापा टाकला होता, या कारवाईत पोलिसांनी ३६ ऑक्सिन सिलेंडर आणि किट आदी मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गोदामाचा मालक इस्माईल अन्सारी आणि वेंडर सचिन सिंग या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपीसह जप्त मुद्देमाल साकिनाका पोलिसांकडे सोपविणत आला असून या दोघांचा आता साकिनाका पोलीस तपास करीत आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न अनेक समाजकंटकांकडून केला जात आहे. त्याचाच हा एक प्रकार आहे.

Exit mobile version