26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामाट्विटरच्या चुकीला माफी नाही...कार्यकारी संचालकावर गुन्हा

ट्विटरच्या चुकीला माफी नाही…कार्यकारी संचालकावर गुन्हा

Google News Follow

Related

भारताचा नकाशा चुकीच्या पद्धती दाखवल्या प्रकरणी ट्विटर या सोशल मीडिया वेबसाईटचे भारतातील कार्यकारी संचालक मनीष महेश्वरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी महेश्वरी यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याची कलमे लावण्यात आली आहेत.

सोमवार, २८ जून रोजी ट्विटरने पुन्हा एकदा भारताची खोडी काढायचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न आता त्यांना चांगलाच महागात पडणार असे दिसत आहे. सोमवारी ट्विटरने आपल्या वेबसाईटवर भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवला. यात भारताचा अविभाज्य भाग असलेले जम्मू आणि काश्मीर, तसेच केंद्रशासीत प्रदेश असलेला लडाखचा लडाख हा चक्क चीनचा भाग म्हणून दाखवण्यात आला. ट्विटर साईटवर असलेल्या ‘करियर’ या पर्यायामध्ये हा चुकीचा भारताचा नकाशा दाखवला गेला आहे.

हे ही वाचा:

भारताने लसीकरणात अमेरिकेलाही टाकले मागे

परमबीर सिंग दोन महिने सुट्टीवर

भारताने केली अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

प्रदीप शर्मासह दोघांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

यावरूनच उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे ट्विटरचे भारतातील कार्यकारी संचालक महेश माहेश्वरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘बजरंग दल’ या संघटनेच्या बुलंदशहर येथील संयोजकाने या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारेच हा गुन्हा दाखल केला गेला आहे. या प्रकरणात महेश्वरी यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम ५०५ (२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलाम ७४ ही कलमे लावण्यात आली आहेत.

भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवायची ट्विटरची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही ट्विटरने २०२० साली अशा प्रकारचा खोडसाळपणा केला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये ट्विटरने भारतातील ‘लेह’ हा प्रदेश चीनचा भाग म्हणून दाखवला होता. त्यावर आक्षेप घेतल्यावर त्यांनी त्या नकाशात बदल केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा