मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाउंट हॅक

यासंदर्भातील अधिक माहिती दिली जाईल,असे मुंबई पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे.

मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाउंट हॅक

मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाउंट अचानक हॅक करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती रेल्वे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. या ट्विटर हँडलवरून जे काही नवीन ट्विट केले जातील त्यावर विश्वास ठेवू नका. यासंदर्भातील अधिक माहिती दिली जाईल,असे मुंबई पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे.

काही दिवसांपासून सायबर क्राईमच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हॅकर्स ट्विटर आणि फेसबुक अकाउंटला टार्गेट करत आहेत. हे थांबवण्यासाठी भारतात सर्व एजन्सी कार्यरत असून कडक यंत्रणा तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आज मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे. या ट्विटर खात्यावरुन जे काही नवीन ट्वीट केले जातील त्यावर विश्वास ठेवू नका, याबाबत लवकरच अधिक माहिती दिली जाईल. या प्रकरणी तपास यंत्रणा सज्ज झाल्या असून अकाउंट लवकरात लवकर पूर्ववत केले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी व्हाट्सअप सुमारे दिड तास बंद होते त्यावेळी सायबर हल्ला झाल्याची अटकळ करण्यात आली होती. मात्र, व्हाट्सअपने जारी केलेल्या निवेदनात ही तांत्रिक चूक असल्याचे म्हटले आहे. ही त्रुटी का आणि कशी झाली याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही.

हे ही वाचा:

दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन बहिणींना मुंबईतून अटक

आईच्या कुशीतून पळवलेल्या ३ महिन्याच्या चिमुरडीची दाम्पत्याच्या तावडीतून सुटका

एलॉन मस्क आता ‘ट्विट चीफ’, ताबा मिळताच सीईओंना कंपनीतून बाहेरचा रस्ता

जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाजवळ स्फोट तर कुलगाममध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा

दरम्यान, हरियाणामध्ये गृह मंत्रालयातर्फे एक चिंतन शिबीर आयोजित केले जात आहे. ज्यामध्ये सायबर क्राईमवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. या शिबिरात अनेक राज्यांतील उच्च पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. गुरुवार, २७ ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शहा यांनी या चिंतन शिबिराला संबोधित केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या शिबिराला संबोधित करणार आहेत.

Exit mobile version