माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाउंट हॅक

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाउंट हॅक

सायबर क्राईम आणि हॅकिंगचे प्रमाण सध्या वाढत असून आता केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे (Ministery of Information and Broadcasting) ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. हॅकरने या खात्याचे नाव बदललं आणि त्यावरून काही काळ ट्वीट्स देखील करण्यात आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर हे अकाउंट पुन्हा रिकव्हर करण्यात आले आहे.

बुधवार १२ जानेवारी रोजी सकाळी हॅकरने हे खातं हॅक करण्यात आले. या खात्यावर जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक एलॉन मस्क यांचे नाव लावून त्यावरून वेगवेगळे ट्वीट करण्यात आले. प्रोफाईलला माशाचा फोटो ठेवण्यात आला होता. या ट्वीट्समध्ये ‘ग्रेट जॉब’ असे लिहून लागोपाठ ट्वीट करण्यात आले होते. सकाळी १० च्या सुमारास हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंत्रालयाने हे खाते पुन्हा रिकव्हर केले.

रिकव्हर झाल्यावर हॅकरने केलेले सर्व ट्वीट्स डिलीट करण्यात आले. तसेच, प्रोफाईल फोटो देखील पुन्हा पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर ट्विटरवर रीतसर ट्वीट करून सर्वांना ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, १२ डिसेंबर २०२१ रोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. थोड्याच वेळात अकाऊंट पुन्हा रिकव्हर करण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत या अकाऊंटवरून क्रिप्टोकरन्सी संदर्भातले काही ट्वीट्स पोस्ट करण्यात आले होते.

हे ही वाचा:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात कारखान्यातून बाहेर पडले टाटा सफारीचे १० हजारावे मॉडेल

‘बोगस डिग्री देण्यापेक्षा दारूच्या दुकानाचा परवाना द्या’

‘परमबीर सिंह यांचा स्वतःच्या पोलीस दलावर विश्वास नाही’ सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

भर बर्फात बॉलीवूड गाण्यावर सैन्याचे कदमताल

३ जानेवारी रोजी इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मान देशी महिला बँक हे तीन ट्विटर अकाउंट्स हॅक करण्यात आले होते. त्यावेळी देखील एलॉन मस्क यांचे नाव ठेवण्यात आले होते. या ट्वीट्सचे फॉन्ट सारखे असल्याचे आढळून आल्याने ३ जानेवारी रोजी झालेल्या हॅकिंगमध्ये आणि आज झालेल्या हॅकिंगमध्ये साधर्म्य असल्याचा प्रशासनाला संशय असून यासंदर्भात अधिक तपास केला जात आहे.

Exit mobile version