राज्यातील मुख्यमंत्री तसेच घटनात्मक पदांवर असणाऱ्या व्यक्तीविरोधात ट्विटरवर हॅन्डलवर टिप्पणी करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणाला अहमदनगर येथील कृषि विद्यापीठातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र सायबर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून अटक करण्यात आलेला तरुण हा महात्मा फुले कृषि विद्यापीठातून पीएचडीचे शिक्षण घेत आहे. अटक करण्यात आलेल्या या तरुणाकडून ट्विटर हँडलचा वापर करून महिलांशी गैरवर्तन करत असल्याचे समोर आले आहे.
गणेश नारायण गोटे (२९) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. १४ ऑक्टोबर रोजी, महाराष्ट्र सायबरला एका तक्रारदाराकडून तक्रार प्राप्त झाली की एक व्यक्ती विशिष्ट ट्विटर हँडल वापरत होती आणि तो त्या ट्विटर हँडलचा वापर करून मुख्यमंत्री आणि उपमहापौरांसह घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तीच्या विरोधात टिप्पण्या पोस्ट करत होता. त्याच बरोबर ती व्यक्ती आपल्या ट्विटर हँडलचा वापर करून महिलांशी गैरवर्तन करत होती.
हे ही वाचा:
मोरबीचा झुलता पूल कोसळला, ५०० हून अधिक लोक बुडाले
भारत वाहतूक विमानांचाही मोठा उत्पादक बनेल
अमरावतीमध्ये इमारत कोसळून ५ जणांचा मृत्यू, कुटुंबीयांना ५ लाखांची मदत
घरमालकांनो भाडेकरूंनची माहिती पोलिसांना द्या अन्यथा कारवाईला सामोरे जा
महाराष्ट्र सायबर विभागाच्या मुंबई विभागाने याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. हा ट्विटर हँडल वापरकर्ता वायफाय, व्हीपीएन इत्यादी वापरत असतांना खबरदारी घेत होता. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी तांत्रिक खोलात जाऊन शोध घेतला आणि ती व्यक्ती प्रत्यक्षात अहमदनगर मधील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून ट्विटरवर पोस्ट टाकून ट्विट करीत असल्याचे तपासात समोर आले. शनिवारी सायबर पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप ताब्यात घेऊन ते तपासणीसाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठविण्यात आले. तपासात गणेश गोटे हा हे सर्व पोस्ट ट्विट करीत असल्याचे समोर आले. याप्रकरणी गणेश गोटे याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून २नोव्हेंबर पर्यत त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे.