विविध मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री तुनिषा शर्माने (२०) आत्महत्या केली आहे. मुंबईला जवळ नायगावमध्ये तिचे चित्रीकरण सुरु होतं. या चित्रीकरणाच्या वेळीच तुनिषाने शनिवारी दुपारी मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चित्रीकरणाच्या ठिकाणीच तिने केलेल्या आत्महत्येमुळे खळबळ माजली आहे. तिने असे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकलेले नाही
सब टीव्ही वाहिनीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये तुनिषा मुख्य भूमिकेत होती. तिने शोच्या मेकअप रूममध्ये गळफास लावून घेतला. तिचा मृतदेह फासावर लटकलेला कोणीतरी पाहिला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. तुनिषाने हे का केले आणि एवढं मोठं पाऊल उचलण्यामागचं कारण काय असेल, याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र सेटवर असे पाऊल उचलल्याने सगळेच चक्रावून गेले आहेत. तुनिषा केवळ २०वर्षांची होती आणि इतक्या लहान वयात तिला प्रसिद्ध शोमध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. सध्या ती प्रसिद्धीच्या झोतातही होती.
हे ही वाचा :
माजी सैनिकांचे टेन्शन दूर, आता मिळणार पेन्शन
५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत
मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट
दास्तान-ए-काबुलमध्ये मरियमची भूमिका साकारणारी तुनिषा याआधीही अनेक मालिकांमध्ये दिसली होती. अशोक सम्राट, गब्बर पुंचवाला, भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप, इंटरनेट वाला लव आणि इष्क सुभानल्लाह यांसारख्या शोमध्ये तिने काम केले आहे.याशिवाय तिने चित्रपटांमध्येही काम केले होते. कहानी २, बार बा देखो आणि फितूरमध्येही ती दिसली होती. कतरिनाच्या दोन्ही चित्रपटांमध्ये त्याने तिच्या बालपणीची भूमिका साकारली होती.
Maharashtra | TV actress Tunisha Sharma committed suicide by hanging herself on the set of a TV serial. She was taken to a hospital where she was declared brought dead: Waliv Police
— ANI (@ANI) December 24, 2022