दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या कासवांना पोलिसांनी जप्त करण्यात यश मिळविले आहे. पाठीवर चांदण्यांचे आकार असलेली ही कासवे दुर्मिळ जातीत मोडतात. त्यांची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यामुळे पोलिसांनी ती कारवाई करून ताब्यात घेतली.
एमएचबी पोलिसांनी अशी कासवे तस्करी करणाऱ्या एका इसमाला पकडले असून तो २० कासवांची तस्करी करणार होता. या कासवांची किंमत साडेतीन लाख इतकी आहे.
ज्याला अटक करण्यात आली आहे त्याचे नाव नदीम शेख असून तो ३३ वर्षीय आहे. पोलिस उपनिरीक्षक दीपक हिंडे यांनी गणपत पाटील नगरातून त्याला अटक केली आहे.
पोलिस म्हणाले की, अशी दुर्मिळ कासवे विकली जाणार आहेत, अशी माहिती आमच्याकडे आली होती. एमएचबी पोलिस ठाण्याच्या हद्दीतच या कासवांची विक्री होणार असल्याचे आम्हाला कळले होते. तेव्हा वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक करण्यात आले. त्यात पोलिस उपनिरीक्षक दीपक हिंडे, कॉन्स्टेबल घोडके, कॉन्स्टेबल शिरसाट यांचा समावेश होता. बोरिवली पश्चिमेला असलेल्या गणपत पाटील नगरात गल्ली क्र. ४ च्या समोरून शेख याला अटक करण्यात आली. आता त्याच्यावर कलम ९, ३९, ४४, ४८ए, ५१ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या (१९७२) अंतर्गत ही कलमे शेख याच्यावर लावण्यात आली आहेत.
हे ही वाचा:
लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्याला मरेपर्यंत तुरुंगवास
महिला क्रिकेट सामन्यांत प्रेक्षकांनीच केला विक्रम
चीन आणि काँग्रेसच्या संबंधांवर अमित शहांनी तोफ डागली
पदयात्रेला ब्रेक देऊन राहुल गांधी परदेश यात्रेला जाणार?
अशा प्रकारची कासवे, पक्षी, प्राणी यांची तस्करी ही आजकाल सर्रास होऊ लागली आहे. मात्र जागरुक पोलिसांमुळे किंवा नागरिकांमुळे हे गुन्हे उघडकीस येऊ लागले आहेत.