अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खान याला वसई सत्र न्यायालयाने एक लाखाच्या सिक्युरिटी बॉन्डवर जमीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. शिझान खान या अभिनेत्याच्या वकिलांनी २० फेब्रुवारीला वसई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आर.डी. देशपांडे यांच्या समोर २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारी आणि चार मार्च या दिवसांमध्ये सुनावणी झाली होती. शिझान खान बरोबरच्या ब्रेकअपनंतर २४ डिसेम्बरला म्हणजे १५ दिवसांनी तुनीषाने आपल्या मालिकेच्या सेटवर वसई कामण येथे तिने आत्महत्या केली होती. शिझान खानवर तुनीषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली २५ डिसेंबर २०२२ ला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो पोलीस कोठडीत होता.
वाळिव पोलिसांनी वसई न्यायालयांत १६ फेब्रुवारीला ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. शिझान खानच्या वकिलांनी त्याला जमीन मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायलयात प्रयन्त केले पण वाळिव पोलिसांनी वसई न्यायालयात दोषरोपपत्र दाखल केल्यामुळे शिझांच्या वकिलांनी उच्च न्यायालयातील अर्ज मागे घेऊन वसईच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता शिझान खान आज बाहेर येण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
ब्रिस्बेनच्या लक्ष्मी नारायण मंदिरात मोदींविरोधी घोषणा
स्टम्प घेऊन आलेल्या हल्लेखोरांचे कोच कोण हे पण आम्हाला माहिती
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट, संशयाची सुई ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर
हिमंता बिस्वसर्मांनी राहुल गांधींवर केला ट्विट हल्ला!
जकार्तामध्ये तेल गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू
काय आहे प्रकरण ?
हिंदी मालिकांमधली अभिनेत्री तुनिशा शर्माने आत्महत्या केली. वसई मध्ये मालिकेच्या शूटिंग दरम्यान तिने आत्महत्या केली. या आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान याला जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईने वळिव पोलीस स्थानकात केली. म्हणून वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतले होते.
Policeकोण आहे शिझान खान?
मुंबई विद्यापीठांत शिक्षण घेतलेला शिझान खान हा अभिनेता आणि मॉडेल आहे. ‘जोधा अकबर’ या मालिकेच्या माध्यमातून त्याने मनोरंजन सृष्टीत पाऊल ठेवले. त्याने ‘अलीबाबा दास्ताने-ए-कुबुल’ या मालिकेमध्ये देखील काम केले होते. याच मालिकेत तुनीषाने सुद्धा प्रमुख भूमिका केली होती.