24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामानैराश्यातून तुनीषाने उचलले आत्महत्येचे पाऊल

नैराश्यातून तुनीषाने उचलले आत्महत्येचे पाऊल

आईची आणि घर कसे चालणार याची काळजी

Google News Follow

Related

टिव्ही अभिनेत्री तुनीषा शर्माच्या आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. इतक्या कमी वयात तिने आत्महत्या का केली हा प्रश्न सगळ्यांना सतावत आहे. तुनीषाचे आत्महत्येचे कारण समोर आले आहे. नैराश्यातून तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. तुनीषाचे चाहते आणि तिच्या काही सहकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

तुनीषा बऱ्याच काळापासून नैराश्यात होती. आपली आई आणि तिचे काम याबद्दल ती खूप तणावाखाली होती. त्यामुळे ती नैराश्यावर औषधे घेत होती. ‘अली बाबा दास्तान ए काबुल’ या सोनी सबवरील तिच्या शो च्या आधीच ती नैराश्याचा बळी ठरली होती असे सांगण्यात येत आहे.घर कसं चालेल याचा तिला सतत विचार असायचा. या सर्व समस्यांमुळे तुनिशा लहान वयातच नैराश्याने ग्रासली होती. त्यामुळे ती अनेकदा डिप्रेशनच्या गोळ्या घेत असे.

हे ही वाचा : 

माजी सैनिकांचे टेन्शन दूर, आता मिळणार पेन्शन

पाकिस्तान विकणे आहे !

५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत

मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट

मिळालेल्या माहितीनुसार, ‘अली बाबा: दास्तान ए काबुल’चा अभिनेता शीजान मोहम्मद खान या अभिनेत्रीला खूप त्रास देत असे. असे मानले जाते की दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही दिवसांपूर्वी शीजानचे तुनिशासोबत ब्रेकअप झाले होते. तुनिषा शर्मा नेहमीप्रमाणे ‘अली बाबा दास्तान ए काबुल’चे शूटिंग करत होती. त्यानंतर चहाचा ब्रेक होताच ती मेकअप रूमच्या दिशेने गेली. बराच वेळ ती बाहेर न आल्याने शेवटी दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी समोर तुनिषाने गळफास घेतलेला बघून सर्वांना धक्का बसला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा