22 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामाहत्या की आत्महत्या : तुनिषाच्या मृत्यूचे पोलिसांसमोरील वाढते आव्हान

हत्या की आत्महत्या : तुनिषाच्या मृत्यूचे पोलिसांसमोरील वाढते आव्हान

तुनीषा शर्माच्या रक्ताचे नमुने,कपडे आणि दागिने फॉरेन्सिक विभागाला तपासणीसाठी पाठवले.

Google News Follow

Related

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये रोज नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. मंगळवारी पोलिसांनी तुनीषा शर्माच्या कपड्यांवरील रक्ताचे नमुने आणि दागिने तपासणीसाठी पाठवले आहेत.

पोलीस पालघरमध्ये ज्या ठिकाणी तुनीषाने आत्महत्या केली त्या ठिकाणी जाऊन धडकले असून, पोलिसांनी गळफासावर असलेल्या रक्ताच्या डागाचे नमुने घेतले तसेच घटनास्थळी सापडलेले तिच्या कानातले आभूषणही ताब्यात घेतले. तुनीषाने ज्या कपड्याने गळफास लावून घेतला तो कपडाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तुनीषाचा मृत्यू झाला त्यादिवशी वापरण्यात आलेला शिजान खानचा मोबाईल आणि कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण १६ लोकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत त्याचप्रमाणे घटनेच्या दिवशी सेटवर उपस्थित असलेल्या सर्व लोकांचे जबाब पोलिसांनी रेकॉर्ड करून घेतले आहेत.

हे ही वाचा:

पत्नीला वीजेचा धक्का देऊन मारले, घरातच दफन केले…

एका वर्षानंतर अनिल देशमुख येणार तुरुंगातून बाहेर

कर्नाटक सरकार चिथावणी देण्याचे काम करते, मुख्यमंत्री शिंदेंनी मांडला ठराव

टॉवरवर जीवघेणे स्टंट करणे पडले महागात

तीन महिने होते रिलेशनशिपमध्ये

तुनीषा शर्मा चा मृतदेह २४ डिसेंबरला ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’च्या सेटवर मेकअप रूमच्या स्वच्छतागृहात लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. या प्रकरणी तुनिषाच्या आईने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी शिजान खानला अटक केली. वसई पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, शिजान खानने सांगितले की, तुनिशा आणि त्यांचे तीन महिन्यांचे संबंध होते. त्यांच्यात वयाचा मोठा फरक होता. या दोघांमध्ये काहीही समोर आलेले नाही, त्यामुळे श्रद्धा वालकर प्रकरणातून धडा घेऊन दोघांनी ब्रेकअप केल्याचे सिद्ध करता येईल, असेही पोलिसांनी सांगितले.

हत्या की आत्महत्या संशय कायम

अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यूप्रकरणी पोलिसांच्या तपासाने आता वेग घेतला आहे आरोपी शिजान खान याला २८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तुनिशा शर्माच्या शवविच्छेदनामध्ये तिचा मृत्यू हा श्वास गुदमरून झाल्याचे सांगण्यात येत आहे परंतु तिचा मृत्यू हा आत्महत्या आहे की हत्या करण्यात आली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा