तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिझान खानला पोलीस कोठडी

आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिझान खानला पोलीस कोठडी

अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणी तिचा सहअभिनेता शिझान मोहम्मद खान याला पोलिसांनी अटक केली आहे. शिझान खान विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस चौकशीदरम्यान तुनिषाच्या आईने तिचा सहकलाकार शिझान खानने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वसई न्यायालयाने त्याला चार दिवसांची कोठडी सुनावली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

तुनिषाचा मृत्यू गळफास लावल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालामध्ये समोर आले आहे. या अभिनेत्रीचा व्हिसेरा जतन करण्यात आला असून, अहवाल आल्यानंतरच काही गैरप्रकार झाले की नाही हे कळेल असे पोलिसांनी म्हटले आहे. तुनिषाचा मृतदेह आज सकाळी कुटुंबीयांना देण्यात येणार होता आणि त्यानंतर संध्याकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते, मात्र आज तिच्यावर अंतिम संस्कार होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. काल रात्री त्यांचे शवविच्छेदनही करण्यात आले असून, त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

हे ही वाचा : 

माजी सैनिकांचे टेन्शन दूर, आता मिळणार पेन्शन

पाकिस्तान विकणे आहे !

५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत

मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट

१५ दिवसांपूर्वीच झाले ब्रेकअप
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाची माहिती देताना मुंबई पोलिसांचे एसीपी चंद्रकांत जाधव म्हणाले की, तुनिषा शर्मा एका टीव्ही शोमध्ये अभिनेत्री म्हणून काम करायची. तुनिशा आणि शीझान खान यांचेही प्रेमप्रकरण होते आणि १५ दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते, त्यानंतर तुनिशाने तिच्या शोच्या सेटवर आत्महत्या केली होती.

गर्भधारणेची चर्चा फेटाळून लावली
पोलिसांनी गर्भधारणेची चर्चा फेटाळून लावली आहे. तुनिषाच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. फाशीमुळे गुदमरन तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तुनिषा फोनवर किंवा सेटवर शेवटच्या वेळी म्हणजे मृत्यूच्या २४ तास आधी ज्यांच्याशी बोलली त्या सर्वांचे जबाब नोंदवले जात आहेत.

Exit mobile version