सोलापूरमध्ये गुरुवार, २९ जून रोजी बकरी ईदच्या दिवशी धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘लव्ह पाकिस्तान’ असे लिहिलेले फुगे विकण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर ही बाब लक्षात येताच नागरिकांनी संबंधित फुगे विकणाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सोलापूरमध्ये ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव नमाज पढण्यासाठी येतात. बकरी ईदच्या निमित्ताने अनेक लोक नमाजासाठी जमलेले असताना जवळच ‘लव्ह पाकिस्तान’ असं लिहिलेले हिरवे फुगे विकले जात होते. एक तरुण असे फुगे नागरिकांना विकत होता. बकरी ईद आणि आषाढी एकादशी दोन्हीही सण एकाच दिवशी आल्याने प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर ताण आहे. अशातच ही गंभीर बाब समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
एक तरुण हे असे फुगे विकत असल्याची बाब लक्षात येताच नागरिकांनी त्या फुगेवाल्याला तातडीने पोलिसांच्या ताब्यात दिलं. माहितीनुसार, तो फुगेवाला अशिक्षित होता. परंतु, हे फुगे कुठे तयार झाले, कुठल्या होलसेल विक्रेत्याकडून त्याने खरेदी केले, याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
हे ही वाचा:
केदारनाथमध्ये खेचरांनी हेलिकॉप्टरपेक्षा २६ कोटी अधिक कमावले!
टोमॅटोचे दर गगनाला का भिडले आहेत?
सदाशिव पेठेतील कोयता हल्ल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचारी निलंबित
चुकीच्या तथ्यांसह ‘कुराण’वर डॉक्युमेंटरी बनवा, बघा काय होते ते
एमआयएम नेते रियाज सय्यद यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिस प्रशासनाला निवेदन दिले आहे. मुस्लीम धर्मीयांच्या सणाच्या दिवशी ईदगाह मैदानावर पाक समर्थनार्थ फुग्यांची विक्रे करणे गंभीर बाब आहे. हे फुगे विक्री करणारे गोरगरीब लोक आहेत. पण यामागे षडयंत्र रचणारे दुसरेच लोक आहेत. त्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सय्यद यांनी केली आहे.