इंदूर धुळे महामार्गावरील पळसनेर येथे झालेल्या विचित्र अपघातात ७ जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. धुळ्याला जाणाऱ्या ट्रकने दोन वाहनांना धडक दिल्यानंतर तो जवळच्या हॉटेलमध्ये घुसला आणि त्यात ७ जण ठार झाले.
यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पवार यांनी माहिती दिली की, आज ४ जुलै रोज़ी सकाळी पावणे अकरा वाजता इंदूरहून धुळ्याकडे जाणाऱ्या रोडवर महामार्ग क्रमांक ३ वर ट्रक क्रमांक आर जे 09 जी बी 9001 चे ब्रेक फेल झाल्याने सदर वाहनाने परमार हॉटेलजवळ एक पादचारी व मोटार सायकल चालकास कट मारली. नंतर पुढे असलेल्या दोन मोटार सायकल तसेच होंडा amaze कार एम एच 18 बी आर 5075 याना जोरदार धडक दिली.
नंतर त्या वाहनाने कंटेनर एन एल 01 ए जी 6447 ला मागून धडक दिली आणि तो ट्रक हॉटेल सदगुरूमध्ये घुसला. मग हॉटेल समोरील बस थांबा तोडून रोडच्या खाली तो उलटा झाला.
सदर अपघातात अंदाजित ७ लोक मृत्यूमुुखी व सुमारे १५ जखमी झाले आहेत. धुळे सिव्हिल आणि शिरपूर सिव्हिल येथे १३ जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने दाखल केले आहेत.
सदर बाबत शिरपुर तालुक़ा पोस्टला कळवण्यात आले होते. तसेच अपघातग्रस्त ट्रक व इतर वाहने रस्त्याचे बाजूला लावली आहेत.
भारतात मुस्लिम पर्सनल लॉ हवा तर मग अमेरिका, ब्रिटनमध्ये तशी मागणी का केली जात नाही?
उद्योगपती अनिल अंबानींच्या पत्नी टीना यांची ईडी चौकशी
खलिस्तानी समर्थकांकडून सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासाला आग
७ जुलैपासून ९९९ रुपयांत जीओ भारत फोन
धुळ्याकडे जाणाऱ्या लेनवर खडी पडल्याने सदर लेनवरील धुळ्याकड़े जाणारी वाहतुक ही १०० मीटर करिता इंदूरलेन वर फिरवण्यात आलेली आहे.