23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामासिक्कीम येथील जत्रेत घुसला ट्रक, तीन ठार

सिक्कीम येथील जत्रेत घुसला ट्रक, तीन ठार

टँकरने तेथील अनेक दुकानांनाही धडक दिली.

Google News Follow

Related

सिक्कीम येथील राणीपूल येथे भरलेल्या जत्रेजवळ पार्क केलेल्या तीन गाड्यांवर एका दुधाचा टँकर धडकल्याने या गाड्या जत्रेच्या मैदानात ढकलल्या गेल्या. त्यामुळे झालेल्या अपघातात तीनजण ठार तर, २० जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. ही धडक इतकी जोरदार होती की, या परिसरात जमलेले अनेक जण गाड्यांच्या चाकाखाली आहे.

संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दुधाच्या टँकरने या गाड्यांना धडक देताच या गाड्या जत्रेच्या ठिकाणी ढकलल्या गेल्या, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. गाड्यांखाली आलेल्या जखमींना मदत करण्यासाठी तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी धाव घेतली.

हे ही वाचा:

दंगलीवेळी ‘त्या’ पाण्याच्या टाकीत पाणी नाही तर भरले होते दगड

‘भारत जोडो यात्रे’ला वेळेआधीच विराम मिळण्याची चिन्हे

प्रियंका गांधी यांच्या टीममधील माजी सदस्य आचार्य प्रमोद कृष्णन निलंबित!

अश्विनने उधळली बुमराहवर स्तुतीसुमने!

प्राथमिक तपासात, दुधाच्या टँकरचा ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे समजते. सर्व जखमींना सेंट्रल रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, अनेकांना जबर जखमा झाल्या आहेत. रुग्णालयात त्यांच्या नातेवाइकांनी एकच गर्दी केली असून मृतांच्या नातेवाइकांचा टाहो रुग्णालय परिसरात ऐकू येत आहे.

जत्रेत तेव्हा तंबोला हा खेळ सुरू होता. त्यामुळे जत्रेच्या मैदानात खूप गर्दी जमली होती. या दुधाच्या टँकर सिक्कीम मिल्क युनियनचे लेबल चिकटवण्यात आले होते. या टँकरने तेथील अनेक दुकानांनाही धडक दिली. त्यामुळे या दुकानांचेही अतोनात नुकसान झाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा