22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामाविनायक मेटे अपघात प्रकरणी ट्रक ड्रायव्हरला अटक

विनायक मेटे अपघात प्रकरणी ट्रक ड्रायव्हरला अटक

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे रविवार, १४ ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली असून ट्रकही ताब्यात घेतला आहे.

Google News Follow

Related

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे रविवार, १४ ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली असून ट्रकही ताब्यात घेतला आहे. गुजरातमधील दमन येथून या ट्रक ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे.

काल पहाटे विनायक मेटेंच्या गाडीचा मुंबईकडे येताना अपघात झाला होता. मेटे यांची गाडी ट्रकला धडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर या अपघातातील ट्रक ड्रायव्हरने पळ काढला होता. दरम्यान, या अपघाताचा तपास करण्यासाठी रायगड पोलिसांनी सहा पथके तयार केली होती. त्यानंतर या ट्रकची ओळख पटली.

संबंधित ट्रक हा पालघर जिल्ह्यातील कासा येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आयसर कंपनीचा हा ट्रक असून या ट्रकचा नंबर DN 09 P 9404 असा आहे. या ट्रक चालकाचे नाव उमेश यादव आहे. दरम्यान चालकाला आणि ट्रक ताब्यात घेण्यासाठी पालघर पोलीस ट्रकच्या मालकासह गुजरातमधील वापी येथे रवाना झाले होते. त्यानंतर त्यांनी गुजरातमधून त्या ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे.

हे ही वाचा:

तुरुंगात असलेल्या मालिकांच्या अडचणीत वाढ, समीर वानखेडेंनी नोंदवला एफआयआर

स्टॉक मार्केटमधील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

रविवारी विनायक मेटे हे मुंबईत बैठकीसाठी येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर शोककाळा पसरली आहे. विनायक मेटे यांच्या पार्थिवावर आज बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा