नाशिक अपघातप्रकरणी ट्रकचालकाला अटक

नाशिक अपघातप्रकरणी ट्रकचालकाला अटक

शनिवारी नाशिकमध्ये खासगी बसला भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. या अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला होता. तर ३० ते ३५ जण जखमी झाले होते. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक चालकाला अटक केली आहे.

काल, ८ ऑक्टोबर रोजी नाशिक येथील नांदूर नाक्याजवळ अपघात झाला होता. या अपघातानंतर बसने पेट घेतला आणि होरपळून बारा जणांना जीव गमवावा लागला होता. काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला आहे. त्यानंतर ट्रक चालक फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याचा शोध घेतला असून, त्याला अटक केली आहे. रामजी यादव (२७) असं आरोपी ड्रायव्हरचे नाव असून तो उत्तरप्रदेशचा रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. त्याला आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे ही वाचा:

बालविवाहाचे प्रमाण झारखंडमध्ये अधिक

शरद पवार म्हणतात, बॉलिवूडला टॉप पोझिशनला पोहोचवण्यात मुस्लिमांचं मोठं योगदान

उद्धव ठाकरेंना दिलेल्या ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर

अरुण गोविल काय म्हणाले ‘आदिपुरुष’ बद्दल

दरम्यान, या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील अपघातानंतर शोक व्यक्त केला होता. तसेच अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिकांनी प्रशासनाला आणि रुग्णवाहिकेला फोन केला पण वेळेवर मदत न मिळाल्यामुळे अपघाताची दाहकता वाढल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version