23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामारस्त्यावरील टोमॅटोंमुळे वाहतूक खोळंबली तब्बल ५ तास

रस्त्यावरील टोमॅटोंमुळे वाहतूक खोळंबली तब्बल ५ तास

Google News Follow

Related

ठाण्याच्या इस्टर्न एक्सप्रेस रोडवरील नाशिक मार्गावर शुक्रवारी पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटला. त्या उलटलेल्या ट्रकमधील २० टन टोमॅटो रस्त्यावर पडल्याने रस्ता जणू टोमॅटोमय झाला होता. ट्रक आणि टोमॅटोच्या खचामुळे मुंबई आणि नाशिक या मार्ग साधारण चार ते पाच तास वाहतूक खोळंबली होती. दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. ट्रक आणि टोमॅटो रस्त्यावरून एका बाजूला केल्यानंतर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वाहतुक हळूहळू सुरळीत झाली. यामध्ये ट्रकचालक जखमी झाल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

के.व्ही.गिरीश यांच्या मालकीचा ट्रक त्यांचा जखमी चालक २० टन टोमॅटो घेऊन ठाण्यातील इस्टर्न एक्सप्रेस रोडवरील नाशिक मार्गावरून जात असताना, ज्ञान साधना कॉलेज जवळील महामार्गावर उलटला. या घटनेत ट्रक हा रस्त्याच्या मधोमध आणि टोमॅटो हे रस्ताभर पसरले होते. त्यातच पावसाचा जोर ही कायम असल्याने मोठा गोंधळ उडाला होता.या घटनेची माहिती मिळताच, ठामपा आपत्ती पथक आणि कोपरी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

ट्रक बाजूला करण्यासाठी क्रेन तसेच टोमॅटो बाजूला करण्यासाठी जेसीबी यांना पाचारण केले. क्रेन आणि जेसीबी आल्यानंतर सकाळी ८ वाजता ट्रक आणि टोमॅटो एकाबाजूला करण्यात आल्यावर वाहतुक सुरू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारापासून नाशिक मार्ग खोळंबला होता. त्याचा परिमाण मुंबई मार्गावर झाल्याने दोन्ही महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना ‘बेस्ट सीएम’ ठरवण्यामागे काँग्रेसचा हात?

कुणी घर देतं का घर! म्हाडाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा

दहावीचा निकाल ९९.९५ टक्के; मग ७५८ मुलांचे काय झाले?

नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू?

ठाण्यात वाहनांच्या रांगा ह्या पांचपाखाडीपर्यंत आल्या होत्या. ही घटना ठाणे – मुंबईच्या सीमेवर घडल्याने त्यातच या महामार्गावरून दररोज सकाळी मुंबईकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूकदारांचे हाल झाले. तसेच सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि २० टॅन टोमॅटो बाजूला केल्यावर वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. या घटनेत पावसामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. चालक ट्रक कुठून कुठे घेऊन जात होता हे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच जखमी चालकाला जवळील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती आपत्ती विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा