हैदराबाद बलात्कार प्रकरणी टीआरएस नेत्याच्या मुलाला अटक

हैदराबाद बलात्कार प्रकरणी टीआरएस नेत्याच्या मुलाला अटक

हैदराबाद येथील ज्युबली हिल्स येथे सामूहिक बलात्काराची धक्कदायक घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. १७ वर्षीय तरुणी गेल्या शनिवारी पबमध्ये पार्टीसाठी गेली असताना पबमधून तिला घरी सोडतो असे सांगून कारमधून नेताना पाच अल्पवयीन मुलांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला होता.

या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपींना अटक केली असून त्यात टीआरएस नेत्याच्या अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याआधी शुक्रवारी या प्रकरणातील पाच आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. घटनेतील पाच आरोपींपैकी तीन अल्पवयीन असून, फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

या प्रकरणात सहभागी असणाऱ्या पाचही आरोपींची ओळख पटली असून, घटनेच्या काही तासांपूर्वी पीडित मुलगी आणि आरोपींचे पबमधून बाहेर पडतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यानंतर आरोपींनी ज्युबली हिल्स परिसरात कार उभी केली आणि पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. तर, काही जण कारच्या बाहेर पहारा देत होते. घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

हे ही वाचा:

शिक्षकांच्या प्रशिक्षणात गोंधळ; ऑफलाइन प्रशिक्षण घेण्याची मागणी

शोपियानमध्ये ग्रेनेड हल्ल्यात दोन मजूर जखमी

धार्मिक स्वातंत्र्यावरील अहवालावरून भारताने अमेरिकेला सुनावले

या व्यवस्थेमुळे पाकिस्तान ‘ऑनर किलिंग’ मध्ये अव्वल

या घटनेच्या तपासादरम्यान पब व्यवस्थापनाने सांगितले की, पार्टीमध्ये कोणत्याही व्यक्तीला मद्यपान किंवा धूम्रपान करण्यास मनाई होती. तसेच ईशान नावाच्या व्यक्तीने पार्टीसाठी जागा बुक केली होती आणि पार्टीनंतर सर्वजण एका कारमधून निघून गेले.

Exit mobile version