ईडीने केला आरोप
अँटिलिया समोरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात एनआयएच्या ताब्यात असलेला मुख्य आरोपी सचिन वाझे याच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. सचिन वाझे याचे नाव आता ईडी तपास करत असलेल्या टीआरपी घोटाळ्यातही जोडले गेले आहे.
सचिन वाझे याने ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलच्या (बीएआरसी) अधिकाऱ्यांकडून ३० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार बीएआरसीच्या अधिकाऱ्यांनी त्याला लाच दिली होती. बीएआरसीने आपल्या खाते पुस्तकात हे पैसे त्यांचा आवारातील बांधकामाशी निगडीत काही कामासाठी दिले असल्याची नोंद केली आहे आणि नंतर बीएआरसीने हे पैसे एका डमी कंपनीच्या खात्यावर जमा केली आहे.
हे ही वाचा:
सचिन वाझेचा साथीदार रियाझ काझीला अटक
‘हिटमॅन’चे गेंड्याच्या बचावासाठी आवाहन
बीएआरसीच्या अधिकाऱ्यांना वाझे बोलावून घेत असे. त्यांना संध्याकाळी उशिरापर्यंत बसायला लावून नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी येण्यास सांगत असे. त्याबरोबरच सचिन वाझे याने संशयितांना चौकशी दरम्यान आपण मारहाण करत असल्याची आणि छळ करत असल्याची प्रतिमा देखील तयार करून ठेवली होती. त्याचा गैरफायदा घेऊन हा छळ टाळण्यासाठी ३० लाख रुपयांची लाच मागत असल्याचा देखील आरोप केला आहे.
ईडीने बीएआरसीच्या अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले आणि त्यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. आता ईडी सचिन वाझे याची चौकशी करणार आहे. त्याबरोबरच वाझेंना सहाय्य करणाऱ्या क्राईम ब्रांचच्या एका अधिकाऱ्याची देखील चौकशी करणार आहे.