साडेचार किलो सोन्याच्या चोरी प्रकरणी दोन पोलिसासह तीन जणांना ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली आहे.अटक करण्यात आलेले पोलीस शिपाई हे ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते या दोघांनी चोरीची योजना आखून अडीच कोटी किंमतीचे घबाड लंपास करण्याचा प्रयत्न केला.
मुंबई पूर्व उपनगरातील मानखुर्द येथील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात मेंग्लोर येथील सोन्याचे व्यापारी यांनी गेल्या आठवड्यात चोरीची तक्रार दाखल केली होती. या व्यापाऱ्याचा नोकर नितीन पाटील याला साडेचार किलो वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन मुंबईतील झवेरी बाजार येथे पाठवले होते, मात्र प्रवासात त्याचे दागिने चोरीला गेल्याचे पाटील याने मालकाला सांगितले.
ट्रॉम्बे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता या चोरीच्या गुन्ह्यात काही तरी काळबेरे असल्याचा संशय ट्रॉम्बे पोलिसांना येताच पोलिसानी नोकर नितीन पाटील याची उलटतपासणी सुरू केली असता नितीन पाटील हा खोटं बोलत असल्याचे त्याच्या चौकशीत समोर येताच त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस शिपाई यांच्या सोबत चोरीचा बनाव रचून ते दागिने पोलीस शिपाई विकास पवार याच्याकडे ठेवण्यास दिले.
हे ही वाचा:
अनधिकृत फेरीवाल्यांकडून जप्त करण्यात आलेल्या सिलिंडरचा झाला स्फोट
त्या गाडीतील इतरांनीही विनयभंग केल्याचे महिलेचे मत
‘महापुरुषांचा अपमान करण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाही’
ट्रॉम्बे पोलिसांनी याप्रकरणी पोलीस शिपाई प्रभाकर नाटेकर (२९), विकास पवार (३०) आणि नितीन पाटील (२८) या तिघांना चोरीच्या गुन्हयात अटक करून त्याच्याजवळून साडेचार किलो सोन्याचे दागिने ( अडीच कोटी रुपयांचे) हस्तगत करण्यात आले.
नोकर नितीन पाटील आणि पोलीस शिपाई विकास पवार हे बालपणाचे मित्र असून विकास पवार, नितीन पाटील आणि नाटेकर यांनी चोरीची योजना आखून अडीच कोटी रुपये किंमतीचे दागिने फस्त करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ट्रॉम्बे पोलिसांनी तो हाणून पाडत हा बनाव उघडकीस आणला.