मुस्लिम महिलांच्या हितासाठी भारतात लागू करण्यात आलेल्या ‘मुस्लिम विवाहित महिलाचा अधिकार संरक्षण कायदा २०१९चे मुस्लिम समाजातील अनेका जणांकडून उल्लंघन करण्यात येत आहे. भारतात हा कायदा लागू करून ट्रिपल तलाकची पद्धत बंद करण्यात आलेली असताना मुस्लिम समाजातील अनेकांकडून तीन वेळा तलाक तलाक तलाक शब्द वापरून विवाहित महिलांचा त्याग केला जात असल्याचा संतापजनक प्रकार सुरू आहे.
मुंबईसह संपूर्ण राज्यभरात मुस्लिम महिलांना घटस्फोट देण्यासाठी अद्यापही ट्रिपल तलाकची प्रथा वापरली जात असल्याचे समोर आले असून मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात महिन्याकाठी मुस्लिम विवाहित महिला अधिकार संरक्षण कायदा २०१९ अन्वये ७ ते ८ गुन्हे दाखल होत आहे. मुंबईतील घाटकोपर पोलिस ठाण्यात २० जून आणि १३ जुलै रोजी मुस्लिम विवाहित महिलाचा अधिकार संरक्षण कायदा २०१९ आणि हुंडाबंदी कायदा अंतर्गत दोन गुन्हे दाखल झाले आहे.दोन्ही गुन्हयात मुस्लिम शरिया कायदा अंतर्गत तीन वेळा तलाक तलाक तलाक बोलून पत्नींना घटस्फोट दिला आहे. दरम्यान, डोंगरी आणि धारावी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहे.
हे ही वाचा:
मुंबईत गणपती विसर्जनासाठी २५ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
भारताच्या पहिल्या ‘वंदे भारत मेट्रो’चे उद्घाटन, ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ नावाने ओळख !
भारताच्या हॉकी संघाने दक्षिण कोरियाला नमवत अंतिम फेरीत मारली धडक !
उद्योगपतीला वाचविण्यासाठी तीन आयपीएस अधिकारी महिलेला छळत होते!
डोंगरी येथील गुन्ह्यात पतीने तीन क्षुल्लक कारणावरून पत्नीला तलाक दिला आहे, पहिले कारण म्हणजे पत्नीने पतीला टॉयलेट मध्ये पाणी टाकले नाही म्हणून जाब विचारला होता, त्यावेळी पतीने पत्नीला मुस्लिम शरिया कायदा अंतर्गत तुला तलाक देत आहे असे म्हटले होते, दुसरे कारण म्हणजे पत्नी सतत माहेरी जात असल्यामुळे दुसरा तलाक दिला आणि तिसरे वेळा पत्नीने बाजारातुन १०० रुपयांची छत्री ३०० रुपये देऊन विकत आणली या कारणाने पत्नीला तलाक देऊन तीन वेळा तलाक तलाक तलाक बोलून घटस्फोट दिल्याप्रकरणी पत्नीने डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.डोंगरी पोलिसांनी मुस्लिम विवाहित महिलाचा अधिकार संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
भारतात २०१९ मुस्लिम शरिया कायदा रद्द करून ट्रिपल तलाकवर बंदी आणण्यात आली आणि मुस्लिम विवाहित महिलांच्या हितासाठी त्यांच्या संरक्षणासाठी महिलाचा अधिकार संरक्षण कायदा २०१९ कलम ४ हा कायदा लागू करण्यात आला आहे. परंतु मुस्लिम समाजातील अनेकांकडून या नवीन कायद्याची पायमल्ली केली जाते आणि अद्यापही मुस्लिम शरिया कायदा वापरला जात आहे. या प्रकरणी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात प्रत्येक महिन्याला ७ ते ८ गुन्हे दाखल होत आहे.