पश्चिम बंगालमधील बहरामपूरमध्ये एका टीएमसी नेत्याची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे.अज्ञात हल्लेखोरांनी तृणमूल काँग्रेसचे नेते सत्यन चौधरी याना घेरून त्यांच्यावर गोळीबार केला.सत्यन चौधरी मुर्शीबादमध्ये पक्षाचे सरचिटणीस होते.
सत्यन चौधरी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेत्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.स्थानिक टीएमसी नेत्यांच्या म्हणण्यानुसार, काही लोक मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी चौधरी यांच्यावर जवळून गोळीबार केला.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.मृत चौधरी हे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचाही जवळचे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.मात्र, नंतर ते टीएमसीमध्ये दाखल झाले.
हे ही वाचा:
एमटीएचएल’पाठोपाठ जानेवारीअखेर कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला होणार
आंध्रप्रदेश: कोंबड्यांना धान्याऐवजी खायला दिले जाते वायग्रा आणि शिलाजीत!
पाच वर्षाच्या मुलीवर ब्रेन ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया
मिळालेल्या माहितीनुसार, बहरामपूरमधील भाकूरी चौकात सत्यन चौधरी आपल्या समर्थकांसह बसले होते.त्यानंतर काही दुचाकीस्वारांनी त्यांना घेरले.यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी चौधरी यांच्यावर गोळीबार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सत्यन चौधरी याना तातडीने मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले.मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही.सत्यन चौधरी यांची हत्या त्यांच्याच लोकांनी केल्याचे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.या प्रकरणी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसानी सांगितले.