दिव्यांगासाठी आरक्षित असलेल्या ट्रेनच्या डब्यातून मोठ्या प्रमाणात पोलीस, रेल्वे कर्मचारी करीत असल्याच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. दिव्यांग नसताना या डब्ब्यातून प्रवास करणाऱ्यावर रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त यांनी दिले आहे. या आदेशावरून मुंबईतील काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मुंबईतील उपनगरीय रेल्वे गाड्यामध्ये दिव्यांगासाठी आरक्षित करण्यात आलेल्या डब्ब्यामध्ये गर्दीच्या वेळी सामान्य प्रवासी,रेल्वे कर्मचारी आणि पोलीस दलातील कर्मचारी प्रवास करीत असल्यामुळे दिव्यांग असणाऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा आम्ही रेल्वे कर्मचारी आहे, पोलीस आहे असे सांगून या सरकारी वर्दीतील कर्मचारी दिव्यांग प्रवाश्याना दमदाटी करतात.
कल्याण, डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला,दादर, भायखळा या स्थानकातून हमखास सामान्य प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि पोलीस दलातील कर्मचारी सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस या डब्यातून प्रवास करीत असल्यामुळे दिव्यांग असणाऱ्या प्रवाश्याना त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या डब्ब्यातून प्रवास करणे अवघड झाले आहे. त्यात सरकारी कर्मचारी, रेल्वे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांना जाब विचारल्यावर उलट त्यांच्याकडून दिव्यांग प्रवाश्याना दमदाटी करण्यात येते अशी माहिती दिव्यांग प्रवाशी राजकुमार कानबांधे यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
जामीन मिळताच नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर डागली टीकेची तोफ
बीडच्या शेतकऱ्याने बांधली दीड कोटींची विहीर…
‘राज्यात टोळीचं सरकार चाललंय काय?’
आंतरराष्ट्रीय प्रवासासंबंधी सुधारित नियमावली
याबाबत रेल्वे प्रशासनाना वेळोवेळी पत्र व्यवहार करण्यात आल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन रेल्वे सुरक्षा बलाला याकडे लक्ष घालण्याचे आदेश दिले आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त यांनी मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे सुरक्षा बल ठाण्यांना लेखी आदेश पाठवून गर्दीच्या वेळी दिव्यांग डब्ब्यात छापेमारी करून दिव्यांग डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशात म्हटले आहे.