30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामादेहविक्रय करण्याच्या नावाखाली तृतियपंथीयांकडून नागरिकांची लूट

देहविक्रय करण्याच्या नावाखाली तृतियपंथीयांकडून नागरिकांची लूट

व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घेतला कसून शोध

Google News Follow

Related

देहविक्रीच्या नावाखाली तृतीयपंथी यांच्याकडून ग्राहकांना मारहाण करून लुटले जात असल्याची घटना सोमवारी समोर आली आहे. धारावी टी जंक्शन येथून वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर तृतीयपंथी आणि त्यांचे पुरुष सहकारी यांच्याकडून होणाऱ्या मारहाण आणि लुटमारीचा व्हिडीओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या घटनेची दखल घेत धारावी पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवली असून पळून गेलेल्या तृतीयपंथी आणि त्यांच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी दिली. मुंबईत द्रुतगती महामार्ग,रस्त्याच्या कडेला असणारे निर्जन ठिकाण तसेच खाडीलगत असणाऱ्या कांदळवनात रात्रीच्या सुमारास तृतीयपंथी देहविक्री करताना आढळून येत आहे. शहरातील धारावी टी जंक्शन ते वांद्रे पूर्व कला नगरच्या दिशेने जाणाऱ्या वाटेत कांदळवनाजवळ मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी तोकड्या कपड्यात उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अश्लील हावभाव करून इशारे करताना दिसून येतात.

या ठिकाणचा एक व्हिडिओ सोमवारी समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओमध्ये तीन तृतीयपंथी एका व्यक्तीला भररस्त्यात मारहाण करीत आहेत. तर त्यांचे दोन पुरुष साथीदार या व्यक्तीच्या खिशातील मोबाईल फोन आणि पाकीट काढताना दिसत आहे. दरम्यान काही लोकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता तृतीयपंथी त्या व्यक्तीला अश्लील भाषेत शिविगाळ करताना या व्हिडीओत दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे मुंबईत खळबळ उडवून दिलेली आहे.

हे ही वाचा:

फडणवीस स्पष्टच म्हणाले, भाजप- शिवसेनेचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरलाय

पगारी चाणक्य, नाक कापलेला राजा

व्हीपवरून शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कलगीतुरा

६ रुपयाचे तिकीट फाडा.. इलेक्ट्रिक डबलडेकर एसी बसने फिरा

या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी धारावी पोलीसांनी काय कारवाई करण्यात आली याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ रविवारी रात्री उशिरा पोलिसांना मिळाल्यानंतर गस्तीवरील पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु त्या ठिकाणी कोणीही सापडले नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

या ठिकाणी दररोज आमची गस्त वाहन उभी राहते, रविवारी शिवजयंती असल्यामुळे गस्त वाहन व पोलीस मिरवणूक बंदोबस्ता साठी होते त्यावेळी ही घटना घडली असावी. मात्र अद्याप या प्रकरणी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात कोणीही आलेले नाही. मात्र आम्ही व्हिडिओतील घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाई सुरू केली असून व्हिडीओ मधील तृतीयपंथी आणि त्यांचे पुरुष साथीदार यांचा कसून शोध घेत आहोत असे कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा