उत्तराखंडमध्ये ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने विजेचा धक्का लागून आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. चमौली जिल्ह्यातील नमामि गंगे प्रकल्पाच्या ठिकाणी घडलेल्या या अपघातात २० हून अधिक लोक जखमी झाले होते. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी श्रीनगरला पाठवण्यात आलेय.
यासंदर्भातील माहितीनुसार मंगळवारी रात्री उशिरा सीवर प्लांटच्या चौकीदाराचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृताचा वैयक्तिक पंचनामा करण्यासाठी पोलीस आणि स्थानिक लोकांसह सीवर प्लांटजवळ पोहोचले असता, अचानक प्लांटमध्ये पुन्हा करंट गेला, त्यामुळे हा अपघात झाला.
चमोलीच्या घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. एसपी चमोली परमेंद्र डोवाल यांनी सांगितले की, चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीच्या काठावर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले.
हे ही वाचा:
आंदोलनात उतरलेल्या बजरंग, विनेशची थेट निवड
जगविख्यात मराठमोळे शरीरसौष्ठवपटू आशिष साखरकर यांचे निधन
किरीट सोमय्यांवर सीडी अस्त्राचा प्रयोग…
जा दादा जा, दिल्या घरी सुखी रहा…
जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उत्तराखंडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही मुरुगेसन यांनी सांगितले की, पोलीस उपनिरीक्षक आणि ५ होमगार्डसह सुमारे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी असे समोर आले आहे की, रेलिंगवर विद्युतप्रवाह पसरल्याने तेथे उपस्थित असलेल्यांना फटका बसला आहे. दुसरीकडे या अपघातामुळे संतप्त नागरिक ऊर्जा महामंडळावर निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत. महामंडळावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. येथे अपघाताची माहिती मिळताच प्रकल्पाचे काम थांबवण्यात आले असून बचाव आणि मदतकार्यासाठी पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.