माहीम वाहतूक विभागाच्या एका पोलीस हवालदाराचे ई चलन मशीन चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माहीम वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार बाबासाहेब पवार हे टोईंग व्हॅन वर कर्तव्य बजावत असताना धारावी टी जंक्शन या ठिकाणी त्यांनी केलेल्या नो पार्किंचे ई चलन काढून वाहन मालकांना दंडाची पावती देत होते. हे सुरू असताना त्यांनी टोईंग व्हॅनच्या बोनेटवर ई चलन मशीन ठेवून पावती बनवण्याचे काम करीत असताना अज्ञात चोरटयांनी पवार यांनी बोनेटवर ठेवलेली ई चलन मशीन चोरी करून पोबारा केला. पोलीस हवालदार पवार यांनी मशीनचा शोध घेतला मात्र ती न सापडल्याने त्यांनी धारावी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.
हे ही वाचा:
‘ब्राऊनी केक’ प्रकरणी सायकॉलॉजिस्ट अटकेत
प्रसादनी उडवली हिंदूविरोधी ट्विटर हँडलची दांडी
कच्छमध्ये होणार भारतातील सर्वात मोठे सोलर पार्क
रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘ट्राइब्ज इंडिया’ चे विशेष राखी कलेक्शन
धारावी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून चोराचा कसून शोध घेण्यात येत आहे. ई मशीन चोरी करण्यामागे चोरट्याचा काय हेतू असू शकतो असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.