30 C
Mumbai
Friday, July 5, 2024
घरक्राईमनामामुंबईत सायलेन्सर, प्रेशर हॉर्न 'रोडरोलर' खाली चिरडले

मुंबईत सायलेन्सर, प्रेशर हॉर्न ‘रोडरोलर’ खाली चिरडले

३३ लाखांचा दंडही वसूल

Google News Follow

Related

मुंबई वाहतूक पोलीस विभागामार्फत मुंबई शहरातील वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मोटार सायकलचे बदल केलेले सायलेन्सर (मॉडिफाय) आणि प्रेशर हॉर्न विरुद्ध राबविलेल्या विशेष मोहीमे दरम्यान ११६३६ वाहनांवर कारवाई करून एकुण २००५ बदल केलेले (मॉडिफाय) सायलेन्सर व कर्णकर्कश आवाज करणारे एकुण ८२६८ प्रेशर हॉर्न जप्त करून त्याच्यावर रोडरोलर फिरविण्यात आला आहे.

या कारवाई दरम्यान वाहतूक पोलिसांकडून ३३,३१,००० रूपये एवढी दंडात्मक कारवाई ही करण्यात आली आहे.

मुंबई शहरातील वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने शहरात २१ मे ते ११जून या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहीम दरम्यान वाहतूक पोलिसांनी मुंबईसह उपनगरात राबवलेल्या कारवाईत मोटारसायकलच्या सायलेन्सर मध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाय सायलेन्सर आणि प्रेशर हॉर्न वर कारवाई करण्यात आली.

मोटार वाहन कायदा u/sec १९४ (F) प्रेशर हॉर्न u/sec CMVR ११९ (२)/177 MVA या कलमांद्वारे कारवाई करून सर्व बदल केलेले सायलेन्सर आणि प्रेशर हॉर्न जप्त केले होते. वाहतूक पोलिसांनी विशेष मोहिमे दरम्यान ११६३६ वाहनांवर कारवाई करून २००५ बदल केलेले (मॉडिफाय) सायलेन्सर व कर्णकर्कश आवाज करणारे ८२६८ प्रेशर हॉर्न जप्त केले होते. त्यांचेवर एकुण ३३,३१,००० रू एवढी दंडात्मक कारवाई ही करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

भाजपाचा ‘शक्तिमान’

ओवेसींच्या दिल्लीतील घराच्या नेमप्लेटवर भारत-इस्रायल संबंधांचे पोस्टर

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी सहा. पालिका आयुक्त बेल्लाळेंची आठ तास चौकशी

‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’तून वर्षाला मिळणार तीन गॅस सिलिंडर मोफत

शुक्रवार सायलेन्सर (मॉडिफाय) आणि प्रेशर हॉर्नवर वरळी पोलीस मैदान, सर पोचखानवाला रोड, वरळी येथे रोडरोलर फिरवून नष्ट करण्यात आले आहे. यादरम्यान वाहतूक विभागाचे वरिष्ठ आणि प्रभारी पोलीस निरीक्षक तसेच उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मुंबई वाहतूक विभागामार्फत वरील मोहीम ही यापुढेही सुरू राहणार असुन सर्व नागरीक व वाहन मालक आणि चालकांना वाहतूक पोलिसांनी आवाहन केले आहे की, शहरात ध्वनी आणि वायु प्रदुषणात भर टाकणारे बदल केलेले (मॉडिफाय) सायलेन्सर व प्रेशर हॉर्न यांचा आपले वाहनांमध्ये वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे यापुढील कार्यवाहीमध्ये अशाप्रकारे बदल केलेले (मॉडिफाय) सायलेन्सर व प्रेशर हॉर्न यांचे निर्माते, वितरक आणि विक्रेते यांचेवरही मुंबई वाहतूक विभागामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा