वाहतूक पोलिसाला मुंबईत मारहाण

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

वाहतूक पोलिसाला मुंबईत मारहाण

वाहनचालकाने वाहतुकीचे नियम मोडल्यावर त्याची चौकशी करत असताना मुंबई मध्ये वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे त्या वाहनचालकांची चौकशी करत असताना ही घटना घडली असून वाहतूक पोलीस हवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी एका ५३ वर्षीय व्यक्तीला या प्रकरणी अटक केली आहे. या संपुर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे हि व्यक्तीच वाहतूक पोलिसाला मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिवाय पोलीस हवालदाराला मारहाण झाली त्यावेळेस अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली होती.  या घटनेमध्ये त्यानंतर अनेक लोक पोलिसाला मारहाण केल्याचं हा व्हिडिओ पाहून आता संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

काय आहे प्रकरण?

कुर्ला पश्चिम डेपो सिग्नल जवळ हि घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. खालिद इसाक वसईकर या ५३ वर्षीय व्यक्तीने स्कुटर चालवत असताना सिग्नल तोडून पळत असल्यामुळे वाहतूक हवालदार यांनी त्याला पकडून चौकशी केली असता खालिद यांनी त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली त्यावेळेस खालिद यांनी आरडाओरडा करून लोकांची गर्दी जमवली. घटनास्थळावर गर्दीतल्या अनोळखी दोन व्यक्तींनी वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करून एका व्यक्तीने पोलिसांच्या कानशिलात लगावून धमकी दिली. हि संपूर्ण घटना जो वायरल व्हिडिओ या मध्ये कॅमेऱ्यात कैद झाली म्हणून या प्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात कलाम ३५३, ३३२, ५०४,५०६ आणि ३४ या भारतीय दंड वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

“गुम है किसी के प्यार में” या प्रसिद्ध मालिकेचा सेट जळून खाक

साई रिसॉर्ट वायकरांच्या पंचतारांकित प्लॅनसमोर चिल्लरच

तरुणाने शेपटाला छेडले आणि वाघ त्याच्यावर उलटला..नंतर जे झाले ते वाईट होते

…म्हणून राज ठाकरे म्हणतात सत्तेपासून आपण दूर नाही!

यातच घटनास्थळी गर्दीतून इतर दोन अनोळखी व्यक्तींनी वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली आणि एकाने पोलीस हवालदाराच्या कानशिलात लगावत धमकी दिली. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद (Viral Video) झाला असून याप्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात कलम 353, 332, 504, 506, 34 भादवि प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  दरम्यान , पुण्यात सुद्धा काही महिन्यांपूर्वी पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली होती.

Exit mobile version