देशातील पर्यटनकांचे आवडते पर्यटन स्थळ म्हणजे गोवा. मात्र पर्यटकांसाठी गोवा सुरक्षित नसल्याचे एका घटनेवरून समोर आले आहे. कॉलेजचे विद्यार्थी गोव्याला फिरायला गेले असते त्यांना तिथे बेदम मारत लुटण्यात आले आहे. हे पर्यटक महाराष्ट्राचे असल्याची माहिती समोर आली आहे.
१७ ते १८ वर्ष वयोगातील कॉलेजची मुलं गोव्याला फिरायला गेली होती. त्यावेळी बोगेश्वर, म्हापसा येथे काही तरुणांनी त्यांना तिथे स्वस्तात जेवण मिळते असे सांगून त्यांना घेऊन गेले. त्यांनतर एका गटाने त्यांना धमकावून रूममध्ये बंद केले. या गटात १० ते १५ मुले होती त्यांनी या पर्यटक मुलांना मारण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे जे पैसे,सोने आहे ते सर्व काढून घेतले. पुढे त्यांना चाकूने धमकावून त्यांच्या नातेवाइकांकडून ऑनलाइन पैसे मागितले. जवळपास एक लाखाचा ऐवज या मुलांकडून त्या गटाने काढून घेतला.
मुलांना या गटाने बेदम मारहाण केली असता दोन मुलं यामध्ये बेशुद्ध झाली. एवढ्यावरच न थांबता पुढे त्या गटाने मुलींना बोलवून काही मुलांना त्यांच्यासोबत दुसरा रूममध्ये नेले. तिथे त्या मुलांना विवस्त्र करून त्यांचा मुलींसोबत व्हिडिओ काढला. त्या मुलांनी जर याबाबत पोलिसांत किंवा कुठे तक्रार केल्यास हा व्हिडीओ वायरल करू अशी धमकी त्यांनी दिली. जेव्हा या मुलांनी त्या गटाला सांगितले ते महाराष्ट्रातून आले आहेत. त्यावेळी त्यांना मुद्दामहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द बोलण्यास सांगितले. एवढा गंभीर प्रकार गोव्यातून उघडकीस आला आहे.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये स्फोट, तीन जवान जखमी
अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; सचिन वाझे माफीचा साक्षीदार
१० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी
त्या मुलांना घेऊन रविवार,५ जून रोजी म्हापसा पोलीस ठाण्यात त्या गटाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. सोबत सुरक्षेसाठी चंदगड पोलीस घेऊन जाणार आहेत. यावेळी या मुलांना न्याय मिळावा म्हूणन प्रयत्न करण्यात येत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि कोल्हापूरचे राजे संभाजी यांना पीडित मुलांना न्याय मिळावा म्हूणन विनंती केली आहे.