दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने विविध ठिकाणी थर उभारताना झालेल्या अपघातात रात्री ९ पर्यंत १९५ गोविंदा जखमी झाले तर १८ जण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. १७७ जणांना सोडून देण्यात आले. मात्र या सगळ्या उत्साहावर कोणाचा जीव गेल्यामुळे सुदैवाने पाणी फेरले गेले नाही.
सरकार आणि पालिका रुग्णालयांकडून जखमी गोविदांची माहिती देण्यात आली. त्यानुसार केईएममध्ये ३१ जखमी गोविंदा होते त्यातील ७ दाखल होते तर २३ जणांवर उपचार सुरू आहेत, एकाला घरी पाठविण्यात आले आहे, सायन रुग्णालयात ७ जखमी दाखल झाले होते आणि त्यांना घरी पाठविण्यात आले. नायर हॉस्पिटलमध्ये ३ जण जखमी गोविंदा दाखल झाले.
जेजे हॉस्पिटलमध्ये ३ जखमी आले आणि त्यांना तपासून घरी पाठविण्यात आले होते. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये एकही जखमी दाखल घेतला नाही. सेंट जॉर्ज रुग्णालयात ३ जण जखमी आले. त्यांना नंतर तपासून सोडण्यात आले. सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये ३ जखमी दाखल झालेत. जीटीला २ जखमी होते. पोद्दारला १६ जण जखमी दाखल झाले. त्यातील १० जणांना घरी पाठविण्यात आले होते. रहेजा, जसलोक या रुग्णालयात मात्र एकही जखमी नव्हता.
हे ही वाचा:
मोबाईल न दिल्यानं तरुणाची हत्या !
१८ सप्टेंबरला काय होणार? धक्कातंत्राचा विरोधकांना धसका
शाहरूखच्या ‘जवान’ चित्रपटामुळे चाहत्यांमध्ये जल्लोष
राजावाडी रुग्णालयात १० जखमी दाखल झाले. त्यातील दोघांवर उपचार सुरू आहेत आणि ८ जणांना सोडण्यात आले आहे. अगरवालमध्ये १, वीर सावरकर हॉस्पिटलमध्ये १, शताब्दीमध्ये ३ जखमी, मा हॉस्पिटल, सर्वोदयमध्ये एकही जण दाखल झाला नाही. बांद्रा येथील भाभामध्ये ३ जखमी होते आणि त्यातील दोघांना घरी पाठविण्यात आले.
व्ही.एन. देसाईमध्ये ४, कूपरमध्ये ६, ट्रॉमा सेंटरमध्ये ४ जखमी, बीडीबीएमध्ये ९ जखमी दाखल झाले. एस. के. पाटील, नानावटी, भगवती या रुग्णालयात मात्र एकही गोविंदा दाखल झाला नाही.