जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे. सोमवार, २१ ऑगस्ट रोजी सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यापैकी एक जण लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील लारो-परिगाम भागातील घरांमध्ये दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलांनी या परिसरात शोध मोहिम सुरू केली होती. सुरक्षा दलाच्या जवानांच्या हालचाली दिसताच दहशतवाद्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली. त्याला सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
या चकमकीत सोमवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी दोन दहशतवादी ठार झाले. यामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचाही समावेश आहे. याठिकाणी सुरक्षा दलाकडून अजूनही शोध मोहिम सुरू असून लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
हे ही वाचा:
‘पुढील ३० वर्षे पंचायतीपासून संसदेपर्यंत भाजपचेच वर्चस्व’
स्पेनच्या महिला संघाची कमाल; पहिल्यांदाच जिंकले फुटबॉलचे विश्वविजेतेपद
ऋतुराज बरसला, संजू, रिंकूही ठरले दमदार
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान !
यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी सुरक्षा दलांनी पूंछ जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यादरम्यान सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका टॉप कमांडरचा खात्माही केला होता. कमांडरच्या मृतदेहासोबत मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आली होती. तर त्याच्या अंगरक्षकाचा मृतदेह अद्याप मिळू शकलेला नाही. तर त्यापूर्वी सुरनकोट भागात शिंद्रा टॉप येथे १७ जुलै रोजी रात्री झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यांची ओळख अद्याप पटलेली नसून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली होती.