आर्यन खानला आज जामीन मिळणार?

आर्यन खानला आज जामीन मिळणार?

क्रुझ पार्टी ड्रग्स प्रकरणी अटकेत असणाऱ्या अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी (२६ ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. गेल्या १८ दिवसांपासून आर्यन खान अटकेत आहे.

आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले होते. गेल्या आठवड्यात बुधवारी विशेष एनडीपीएस कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आर्यन खानला आज जामीन मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

हे ही वाचा:

धक्कादायक! महाराष्ट्रात दहा महिन्यांत २० वाघांचा मृत्यू!

भाडेवाढीतून एसटीला मिळणार इतके कोटी

आयकर विभागानेही पूर्ण केले १०० कोटींचे टार्गेट

पूर्वीची सरकारे केवळ आपल्या कुटुंबाच्या तिजोऱ्या भरत होती

आर्यनच्या वकिलांकडे ३० ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे, कारण त्यानंतर १२ दिवस कोर्टाला दिवाळीची सुट्टी असणार आहे. जर या सात दिवसांत कोर्टात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होऊन कोर्टाने आपला निर्णय दिला नाही, तर आर्यन खानला दिवाळी दरम्यान जेलमध्येच रहावे लागणार आहे. कोर्टात एनसीबीने आर्यनचे संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाशी असल्याचा आरोप करत एनडीपीएस अॅक्टच्या कलम २९ अ अंतर्गत आर्यनच्या जामीनाला विरोध केला होता. जो कोर्टाने मान्य केला होता.

क्रूझवरील पार्टी प्रकरणात एनसीबीने आर्यन खानला अटक केली होती. क्रूझवरील ड्रग्स पार्टी उधळत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यातील तीन जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांचा समावेश होता.

Exit mobile version