21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामासायबर गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी, अंमलदार म्हणजे 'सायबर कमांडो'

सायबर गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी, अंमलदार म्हणजे ‘सायबर कमांडो’

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या शुभहस्ते सायबर शिल्ड लोगोचे अनावरण करण्यात आले.

Google News Follow

Related

मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यातील सायबर गुन्हे संदर्भातील कामकाज पाहणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारासाठी सायबर प्रशिक्षण कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. या सायबर प्रशिक्षण कार्यक्रमात सायबर तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शन संबंधित अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर,विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त सत्य नारायण तसेच जी. एस. राणा, चीफ जनरल मॅनेजर, मेट्रो सर्कल, स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई हे मान्यवर उपस्थित होते.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत म्हणुन या अधिकारी आणि अंमलदार यांना “सायबर कमांडो” म्हणुन घोषित करून त्यांचा सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी गौरव केला.तसेच या सायबर कमांडोमुळे सायबर गुन्हयांचा तपास व प्रतिबंध प्रभावीपणे होणार आहे तसेच संपुर्ण मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलेल्या अत्याधुनिक सायबर कक्षामुळे गतवर्षीपेक्षा सायबर गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे असल्याचे सांगून सहपोलिस आयुक्त चौधरी यांनी म्हटले आहे.

भविष्यात आणखी कसोशीने प्रयत्न करण्याबाबत प्रशिक्षणार्थी अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करण्यात आले.तसेच उपस्थित विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी मागील वर्षात सायबर अधिकारी व अंमलदार यांच्या कार्यतत्परतेमुळे सायबर गुन्हयांस बळी पडुन ज्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे अशा अनेक बळीतांचे मिळून सुमारे रूपये २५ कोटी पेक्षा अधिक रक्कम गोठविण्यात आली असल्याची माहिती दिली.

अशा पध्दतीने फसवणुक होवु नये याकरिता जनजागृती आवश्यक असुन त्यामध्ये सायबर हेल्पलाईन क्र. १९३० हा उपयोगी असुन त्याची माहिती सर्वां पर्यत पोहचविण्याचे आवाहन केले तसेच भविष्यात सायबर गुन्हयांची वाढणारी तीव्रता व क्लिष्टता लक्षात घेवुन सायबर अधिकारी व अंमलदार यांनी स्वतःला सतत प्रशिक्षित करत राहिले पाहिजे अशा शब्दात मार्गदर्शन वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून करण्यात आले.

हे ही वाचा:

हमासने गुडघे टेकले, इस्रायलला पाठवला युध्दविरामाचा प्रस्ताव!

अरविंद केजरीवालांना मोठा झटका, १७ फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश!

इंग्रजांचा प्रभाव असलेली काँग्रेस आऊटडेटेड

नांदेड: धार्मिक कार्यक्रमात जेवणानंतर तब्बल २००० लोकांना अन्नातून विषबाधा!

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या शुभहस्ते सायबर शिल्ड लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच सायबर गुन्हयांबाबत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या व प्रसारीत करण्यात येणाऱ्या इंग्लिश व मराठी भाषेतील पोस्टर यांचेसुध्दा अनावरण केले. प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त यांनी सायबर गुन्हे उघडकीस आणणे व प्रतिबंध करणे यासाठी मुंबई पोलीस हे कसोशीने प्रयत्न करीत असून त्यांना आणखी प्रशिक्षण देवुन अधिक कार्यक्षम बनविण्यात येणार असल्याचे सुतोवाच केले तसेच सायबर हेल्पलाईन क्र. १९३० हा सायबर गुन्हे प्रतिबंधासाठी अतिशय उपयोगी असुन पोलीसांबरोबरच पत्रकार मित्रांनीसुध्दा या सायबर हेल्पलाईन क्रमांकाचा प्रचार व प्रसार करावा असे आवाहन केले. या प्रशिक्षणाकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे सहकार्य लाभले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा