विरारमध्ये नुकतीच बॅंकेत जी दरोड्याची एक घटना घडली त्यात एका माजी बँक व्यवस्थापकानेच हा दरोडा घातल्याचे समोर आले होते. त्यात या बँकेत काम करणाऱ्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण हा दरोडा त्याने का टाकला, याचे कारण मात्र धक्कादायक होते.
सोने आणि पैशाची बॅग घेऊन फरार होत असताना अनिल दुबे नावाच्या एका दरोडेखोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जो दरोडेखोर पकडलेला आहे तो दरोडेखोर याच बँकेत पूर्वी मॅनेजर असल्याचीही माहिती आहे. जवळपास एक कोटीचे कर्ज फेडण्यासाठी त्याने हा दरोडा घातल्याचे समोर आले आहे.
बँक लुटण्याचा प्रयत्न करणारा आरोपी अनिल दुबे याला ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुबे याच्यावर १ कोटी रुपयांचे कर्ज असल्याने कर्ज फेडण्यासाठी त्याने हा कट आखल्याचे तपासात समोर आले. या हल्ल्यात बँकेच्या व्यवस्थापिका योगिता वर्तक-चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर रोखपाल श्रद्धा देवरुखकर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर विरारच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्ल्यात योगिता चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर श्रद्धा देवरुखकर या जखमी झाल्या होत्या.
हे ही वाचा:
जैश ए मोहम्मदच्या ‘या’ दहशतवाद्याला कंठस्नान
ठाणे शहर कशामुळे गुदमरते आहे? वाचा…
हिंदू देवस्थानांबाबत कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय!
आरोपी दुबे याचे शेअर बाजारात ५० लाख रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळेच हा दरोड्याचा प्लॅन आखण्यात आला. मुख्य म्हणजे दुबेवर अनेक वैयक्तिक कर्जे देखील होती. एकूण १ कोटीचे कर्ज दुबेवर झाले होते. त्यामुळे त्याने बँक लुटण्याची योजना आखली. या वेळी त्याने बँकेच्या लॉकरमधील सव्वादोन कोटी रुपयांचा सोने आणि रोख रक्कम असा ऐवज लुटून नेला होता. मात्र स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे तो पकडला गेला. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.