तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांना सोमवारी गुजरात पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना अहमदाबाद न्यायालयात जामीन मंजूर झाला. मात्र, सुटकेनंतर पोलिसांनी गोखले यांना त्याच गुन्ह्यासाठी पुन्हा अटक केली आहे.
साकेत गोखले यांना मोरबी पूल दुर्घटनेवेळी पंतप्रधान मोदींबद्दल खोट्या बातम्या पसरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर गुरुवारी अहमदाबाद येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, त्यानंतर लगेच त्यांना नोंदवलेल्या दुसर्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे.
गुरुवार, १ डिसेंबर रोजी अहमदाबाद सायबर क्राईम पोलिसांनी गोखले यांच्यावर आयपीसी कलम ४६९, ४७१, ५०७ आणि ५०५ बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर मोरबी पोलिसांनी लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि गोखले यांना पुन्हा अटक केली.
हे ही वाचा :
इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्या आंदोलकाला फाशी
इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्या आंदोलकाला फाशी
लग्न सोहळ्यात सिलेंडरचा स्फोट, चार मृत्यू
भिवंडीत सराईत गुंड गणेश कोकाटेवर अज्ञात गुंडाचा गोळीबार
साकेत गोखले यांनी गेल्या दावा केला होता की, मोरबी पूल कोसळल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या गुजरातमधील मोरबी दौऱ्याच्या व्यवस्थेवर ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यावर साकेत गोखले यांनी एका गुजराती वृत्तपत्राचे कटआउट ट्विटरवर पोस्ट केले. त्यानंतर साकेत गोखले यांचा दावा फेटाळून लावत पीआयबी फॅक्ट चेक टीमने तो खोटा असल्याचे म्हटले आहे. याबाबत साकेत गोखले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप आहे.