मोरबी दुर्घटनेची खोटी माहिती पसरवल्याबद्दल साकेत गोखलेला अटक

खासदार डेरेक ओब्रायन यांनी साकेत यांच्या अटकेची ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

मोरबी दुर्घटनेची खोटी माहिती पसरवल्याबद्दल साकेत गोखलेला अटक

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांना सोमवारी गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना गुजरात पोलिसांनी राजस्थानमधील जयपूर विमानतळावरून अटक केली आहे. साकेत गोखले यांच्यावर मोरबी पूल दुर्घटनेवेळी पंतप्रधान मोदींबद्दल खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप आहे.

तृणुमुल काँग्रेस पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी साकेत यांच्या अटकेची ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, सोमवारी साकेतने नवी दिल्लीहून जयपूरला रात्री ९ वाजता उड्डाण केले. जेव्हा तो उतरला तेव्हा गुजरात पोलिस राजस्थानच्या विमानतळावर त्याची वाट पाहत होते आणि मंगळवारी पहाटे २ वाजता त्याला उचलले. त्याने आईला फोन करून सांगितले की ते त्याला अहमदाबादला घेऊन जात आहेत आणि आज दुपारपर्यंत तो अहमदाबादला पोहोचेल. पोलिसांनी साकेतला दोन मिनिटांचा फोन कॉल करू दिला आणि नंतर त्याचा फोन आणि सर्व सामान जप्त केले, अशी माहिती ओब्रायन यांनी ट्विट करून दिली आहे.

साकेत गोखले यांनी गेल्या १ डिसेंबरला दावा केला होता की, मोरबी पूल कोसळल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या गुजरातमधील मोरबी दौऱ्याच्या व्यवस्थेवर ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यावर साकेत गोखले यांनी एका गुजराती वृत्तपत्राचे कटआउट ट्विटरवर पोस्ट केले. त्यानंतर साकेत गोखले यांचा दावा फेटाळून लावत पीआयबी फॅक्ट चेक टीमने तो खोटा असल्याचे म्हटले आहे. याबाबत साकेत गोखले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा : 

अदानींकडे आता प्रणव-राधिका रॉयपेक्षा जास्त शेअर्स; किती वाढले?

‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’

पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका

एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला

दरम्यान, मोरबी पूल दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातस्थळी जाऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदींनी रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. मोरबी पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १३५ जणांच्या नातेवाईकांना मोदींनी प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० रुपयांची मदत जाहीर केली होती.

Exit mobile version