लाल किल्ला हल्ल्यातील आरोपी आरिफला फाशीची शक्यता

तिहार तुरुंग प्रशासनाचे न्यायालयाला पत्र

लाल किल्ला हल्ल्यातील आरोपी आरिफला फाशीची शक्यता

लाल किल्ल्यावरच्या हल्ल्याप्रकरणातील दोषी मोहम्मद आरिफला लवकरच फाशी दिली जाऊ शकते. तिहार तुरुंगाने डेथ वॉरंट जारी करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात तिहार तुरुंग प्रशासनाने न्यायालयाला पत्र लिहिले आहे. मोहम्मद आरिफने २००० मध्ये लाल किल्ल्यावर हल्ला केला होता . या घटनेत २ जवान शहीद झाले होते. तिहार तुरुंगाने ३ फेब्रुवारीला तीस हजारी न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश ओ. पी सैनी यांच्या न्यायालयाला पत्र लिहिले होते. सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपतींकडून दयेच्या याचिकेत दोषी ठरलेल्या मोहम्मद आरिफचे पर्यायही संपले आहेत.

लाल किल्ल्यामध्ये २२डिसेंबर २००० रोजी ६ दहशतवादी घुसले होते. लाल किल्ल्यात घुसल्यानंतर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात लष्कराच्या २ जवानांसह ३जण शहीद झाले होते. दहशतवादी हल्ल्यात रायफलमन उमा शंकर आणि नाईक अशोक कुमार शहीद झाले होते. याशिवाय अब्दुल्ला ठाकूर नावाचा एक व्यक्तीही या हल्ल्याचा बळी ठरला होता. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा:

शिवसेनेचे विधीमंडळातील कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात..शिवालयही येणार

जेएनयूमध्ये शिवाजी महाराजांच्या तस्बिरीचा अवमान; डावे, अभाविप कार्यकर्ते भिडले

आक्षेपार्ह विधानाविरोधात संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा

११व्या मुलाच्या जन्मानंतर त्याने पत्नीला घराबाहेर काढले…

हे सर्व दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे होते. लाल किल्ल्यावरील हल्ल्याचा दहशतवादी मोहम्मद आरिफचा दोष न्यायालयात सिद्ध झाला आहे. त्यामुळे त्याला लवकरच फाशी दिली जाण्याची शक्यता आहे.

कोण आहे मोहम्मद आरिफ
मोहम्मद आरिफ हा पाकिस्तानी नागरिक आहे. तो लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी आहे. २००५ मध्ये न्यायालयाने मोहम्मद आरिफला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही लाल किल्ल्यावरील हल्ल्यातील दोषी मोहम्मद आरिफची फाशीची शिक्षा कायम ठेवली.

Exit mobile version