विनाकारण घरातून बाहेर पडून वाहनातून फिरणाऱ्या टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांना चांगलेच महागात पडले आहे. वांद्रे पोलिसांनी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १८८सह ३४( कोरोना प्रतिबंध नियमांचे उल्लंघन करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे.
अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे दोघे बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वांद्रे बँडस्टड परिसरात मोटारीतून फिरत असताना बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांचे वाहन अडवले. दोघांना बाहेर फिरण्याचे कारण विचारले असता त्यांच्याकडे सांगण्यासारखे ठोस कारण नव्हते.
हे ही वाचा:
त्यांनी केले ‘चमकोगिरी’चे आंदोलन
पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’
जळगावमध्ये गिरवले जाणार विमान उड्डाणाचे धडे
‘तुझ्या बापाला’ वर महापौर म्हणतात, मी लिहिलंच नाही
लसींच्या वितरणात ठाकरे सरकारने घातला घोळ
पोलिसांनी त्यांना लॉकडाऊन सुरू असताना विनाकारण बाहेर फिरत असल्यामुळे कोरोना प्रतिबंध नियमांचे तुम्ही उल्लंघन केले असल्याचे सांगून त्याच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम १८८सह ३४( कोरोना प्रतिबंध नियमांचे उल्लंघन करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे.
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्यावर गुन्हा दाखल होताच मुंबई पोलिसांच्या ट्विटर वर हिरोपंती पडली महागात ! या शब्दात टिप्पणी करण्यात आली आहे. पोलिसांच्या या ट्विटर हँडलवर टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या वॉर, मलंग आणि हिरोपंती या चित्रपटांचा खुबीने उल्लेख करत बाहेर फिरणाऱ्या टायगर दिशाची खिल्ली पोलिसांनी उडविली आहे.
'हिरोपंती' पडली महागात!
अत्यावश्यक कारण नसताना देखील बाहेर फिरणाऱ्या अभिनय क्षेत्रातील दोन कलाकारांवर वांद्रे पोलिसांनी भारतीय दंड संहिता, कलम १८८, ३४ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
मुंबईकरांना विनंती आहे की कृपया आम्हाला कोरोनाविरुद्धच्या 'वॉर' मध्ये सहकार्य करा. https://t.co/5yCEUoB2QO— Mumbai Police (@MumbaiPolice) June 3, 2021